शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऊस उत्पादकांचे ३०० कोटी कारखान्यांकडे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:07 IST

कोपार्डे : सध्या साखर दर घसरल्याचे कारण पुढे करून हंगामाच्या सुरुवातीला ठरलेला उसाचा एफआरपी + १०० अशा पहिल्या हप्त्याऐवजी २५०० रुपये असा प्रतिटन दर देण्याची सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम २००६/०७ मधील दुसºया हप्त्यापोटी कारखानदारांनी बुडविलेल्या ३०० कोटी रुपयांची सध्या चर्चा सुरू आहे.गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू ...

कोपार्डे : सध्या साखर दर घसरल्याचे कारण पुढे करून हंगामाच्या सुरुवातीला ठरलेला उसाचा एफआरपी + १०० अशा पहिल्या हप्त्याऐवजी २५०० रुपये असा प्रतिटन दर देण्याची सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम २००६/०७ मधील दुसºया हप्त्यापोटी कारखानदारांनी बुडविलेल्या ३०० कोटी रुपयांची सध्या चर्चा सुरू आहे.गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होताना थोडी खळबळ होते; पण शासन म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील हे मध्यस्थाची बजावत असलेली चोख भूमिका व शेतकरी संघटना, कारखानदार त्याला देत असलेला सामोपचाराचा मान यामुळे सुरळीत हंगाम सुरू होतो; पण अचानक साखरेचे दर गडगडतात आणि ऊस उत्पादकांचे उसाचे पैसे वेळेत देण्यासाठी कारखानदारांना यातायात करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यावर्षीही हीच अवस्था झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंटल होते. ते आज २८०० ते २९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरलेले आहेत. यामुळे बँंकांनी पतपुरवठा करण्यासाठी हात आखडता घेतल्याने कारखानदारांना एफआरपी+१०० असा पहिला हप्ता देण्यासाठी पैशांची उपलब्धता होत नसल्याने यावर्षी त्याऐवजी २५०० रुपये देण्यासाठी सुरुवात केली आहे.नेमकी अशीच आर्थिक परिस्थिती हंगाम २००६/०७ मध्ये हंगामाच्या सुरुवातीला झाली होती. यावेळी हंगामाची सुरुवात असल्याने कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब होत असल्याने ऊस उत्पादकांचेच यात नुकसान होणार असल्याने शेतकरी संघटनांनी मिळतेजुळते घेण्यासाठी ९००+३८० असा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. यात ९०० पहिला, तर ३८० रुपये हंगाम संपल्यानंतर देण्याचे ठरले. यावेळी मध्यस्थी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी भूमिका बजावली. तर दिवंगत खा. सदाशिवराव मंडलिक, खा. राजू शेट्टी व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. मात्र, हंगाम संपला तरी हा ३८० रुपयांचा दुसरा हप्ता दहा वर्षे झाली तरी अजून शेतकºयांना मिळालेला नाही. या हंगामात सर्वसाधारण ९० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांकडून करण्यात आले होते.या उसाचे ३८०प्रमाणे दुसºया हप्त्याची रक्कम ३४० कोटींच्या घरात आहे. आजही हे हंगाम २००६/७ मधील ३४० कोटी रुपये कारखानदारांच्या बटव्यात आहेत.सर्वाधिक रक्कम वारणा व जवाहरकडे थकीत२००६/0७ च्या हंगामात वारणा कारखान्याने १२ लाख ५५ हजार ६७९ मे. टन उसाचे गाळप केले. यापोटी ४७ कोटी ७१ लाख ५८ हजार २०रुपये सर्वाधिक थकीत होते. तर त्या पाठोपाठ जवाहर कारखान्याने ११ लाख ७३ हजार ६७६मे. टन ऊस गाळप केले होते. यापोटी ४४ कोटी ५९ लाख ९६ हजार ८८० रुपये थकीत आहेत.हंगाम २००६-०७ मध्ये ३८०च्या दुसºया हप्त्यापोटीचे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे आजअखेर थकीतकारखान्याचे नाव हंगामात ऊस गाळप ३८० च्या हप्त्यापोटी(लाख मे. टन) थकीत रक्कम (कोटीत)भोगावती, परिते ५,४५,७२४ २०,७३,७५,१२०मंडलिक, हमीदवाडा ५,२१,४१४ १९,८१,३७,३२०जवाहर, हुपरी ११,७३,६७६ ४४,५९,९६,८८०दूधगंगा-वेदगंगा, बिद्री ६,४२,९०० २४,४३,०२,०००वारणा कारखाना १२,५५,६७९ ४७,७१,५८,०२०छ. राजाराम, बावडा ३,७५,३४६ १४,२६,३१,४८०दत्त, शिरोळ १०,२५,२८० ३८,९६,०६,४००पंचगंगा, इचलकरंजी ६,४३,१९३ २४,४४,१३,३४०शरद, नरंदे ४,१४,७३३ १५,७५,९८,५४०डी. वाय. पाटील ३,५५,१५३ १३,४९,५८,१४०दत्त, आसुर्ले-पोर्ले १,३१,००० ४,९७,८०,०००गडहिंग्लज ३,७८,३३२ १४,३७,६६,१८०कुंभी-कासारी, कुडित्रे ५,१४,१६२ १९,५३,८१,५६०गुरुदत्त, टाकळी ५,६९,९८० २१,६५,९२,४००दौलत, चंदगड ५,१७,६९५ १९,६७,२४,१००उदयसिंह गायकवाड, बांबवडे १,९६,२६३ ७,४५,७९,९४०