शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शेंडा पार्क येथील कुष्ठपिडितावर आली स्वतः जेवण करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 15:23 IST

कोल्हापूर ः शेंडा पार्क येथील कुष्ठधाम रुग्णालयातील स्वयंपाकी पगार न मिळाल्यामुळे कामावर येत नसल्याने कुष्ठ पीडित रुग्णांनाच स्वतःचे जेवण स्वतः ...

ठळक मुद्देशेंडा पार्क येथील कुष्ठपिडितावर आली स्वतः जेवण करण्याची वेळमानधन न मिळाल्यामुळे स्वयंपाकीने केले काम बंद

कोल्हापूर ः शेंडा पार्क येथील कुष्ठधाम रुग्णालयातील स्वयंपाकी पगार न मिळाल्यामुळे कामावर येत नसल्याने कुष्ठ पीडित रुग्णांनाच स्वतःचे जेवण स्वतः करण्याची वेळ आली आहे.

ज्या हातांना संवेदना नाहीत त्यात हाताने चुलीवर त्यांना स्वयंपाक करावा लागत आहे. ज्या शासकीय यंत्रणेकडे जबाबदारी देण्यात आली आहे, ती याकडे  दुर्लक्ष करत असल्याने कुष्ठरुग्णांचे  दहा दिवसापासून प्रचंड  हाल होत आहे.राज्य शासनाच्या शेंडा पार्क या ठिकाणी निवासी असलेले 15 कुष्ठरोग पीडित रुग्णांसाठी स्वयंपाकी म्हणून दोन कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र गेले वर्षभर त्यांना मानधन न मिळाल्यामुळे त्यांनी गेले दहा दिवसापासून हे काम करण्यास बंद केले आहे. त्यामुळे या कुष्ठ पीडितांवर उपासमाराची वेळ आली आहे.

शासकीय यंत्रणा त्यांच्याकडे लक्ष दुर्लक्ष करत असल्यामुळे हे पीडित येथील स्वयंपाक घराच्या बाहेरच चुली मांडून भात, आमटी करून पोटाची खळगी भरून दिवस काढत आहेत. शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, व या रुग्णांची जेवणाची सोय करावी अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर