शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उत्साही वातावरणात शिवगर्जना महानाट्याचे तिकीट अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 16:57 IST

कोल्हापूर येथील भूमिपुत्रांनी साकारलेले व भारतभर घोडदौड करणारे आशिया खंडातील भव्यदिव्य ‘शिवगर्जना’ हे महानाट्य २४ जानेवारीपासून कोल्हापुरात होत आहे. त्याचा तिकीट अनावरणाचा व नाटकाच्या ६० बाय २० फूट फलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम शनिवारी उत्साहात झाला.

ठळक मुद्देउत्साही वातावरणात शिवगर्जना महानाट्याचे तिकीट अनावरणशिवाजी चौकात उभारला ६० बाय २० फुटांचा फलक : २४ जानेवारीपासून नाट्यसूर

कोल्हापूर : येथील भूमिपुत्रांनी साकारलेले व भारतभर घोडदौड करणारे आशिया खंडातील भव्यदिव्य ‘शिवगर्जना’ हे महानाट्य २४ जानेवारीपासून कोल्हापुरात होत आहे. त्याचा तिकीट अनावरणाचा व नाटकाच्या ६० बाय २० फूट फलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम शनिवारी उत्साहात झाला.छत्रपती शिवाजी चौकात महानाट्याच्या तिकिटाचे अनावरण प्रमुख पाहुणे आमदार चंद्रकांत जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी उपमहापौर भूपाल शेटे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, योगदान फौंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.यावेळी हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रसंगांचा भव्य डिजिटल फलक उभारण्यात आला. तो पाहण्यासाठी शिवप्रेमींसह शहरवासीयांची दिवसभर गर्दी झाली होती. तिकिटाची विक्री सोमवार (दि. १३) पासून केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू स्मारक भवन व ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क येथे होणार आहे. महानाट्य २४ ते २८ जानेवारी या कालावधीत सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत जरगनगर मार्गावरील निर्माण चौकात होणार आहे.यावेळी निर्मात्या रेणू यादव, दिग्दर्शक स्वप्निल यादव, शिरीष कदम, रतनलाल बाफनाचे विकास जैन, आविष्कार ग्रुपचे अविनाश जाधव उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Natakनाटकkolhapurकोल्हापूर