शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

थरारली मने, सुन्न झाल्या दिशा... थिजले अश्रू अन् नि:शब्द भारतमाता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:49 IST

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर गुरुवारी (दि. १४) रात्रीपासूनच सोशल मीडियावरील वातावरणही गंभीर बनले. एकीकडे या सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहताना पाकिस्तानविरोधातील तीव्र संताप सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसत होता.

ठळक मुद्देथरारली मने, सुन्न झाल्या दिशा... थिजले अश्रू अन् नि:शब्द भारतमाता...व्हॉट्स अ‍ॅपवरील डीपी बदलले, विनोदी पोस्टना फाटा

कोल्हापूर : दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर गुरुवारी (दि. १४) रात्रीपासूनच सोशल मीडियावरील वातावरणही गंभीर बनले. एकीकडे या सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहताना पाकिस्तानविरोधातील तीव्र संताप सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसत होता.या भीषण हल्ल्याची सविस्तर माहिती गुरुवारी सायंकाळी मिळाल्यानंतर लगेचच अनेकांनी आपले डीपी बदलले. तसेच यापुढील २४ तासांमध्ये कोणतेही विनोद आणि अन्य पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन अ‍ॅडमिनकडून केले जात होते. त्याचे तंतोतंत पालन केले जात असल्याचेही दिसून आले. अनेक डीपींच्या माध्यमातून जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश दिवसभर सुरूच होते.केंद्र सरकारने कडक भूमिका स्वीकारावी, अशा अपेक्षाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केल्या. ठिकठिकाणी जवानांना श्रद्धांजली वाहतानाचे फोटो टाकले जात होते. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीची बैठक घेतल्यानंतरच्या निर्णयाची माहितीही सोशल मीडियावरून फिरत होती.या हल्ल्यातील जवानांचे मृतावस्थेतील फोटो शेअर करू नका, असे आवाहनही करण्यात येत होते. तसेच शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध सभा, पुतळा जाळण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचे आवाहन करणारे संदेशही गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आणि शुक्रवारी सकाळी सुरू होते.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाkolhapurकोल्हापूर