इंग्रजी माध्यमातून ११00 विद्यार्थी जि. प. शाळांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:22 AM2018-04-25T00:22:38+5:302018-04-25T00:22:38+5:30

Through 1100 students of English Par. In schools | इंग्रजी माध्यमातून ११00 विद्यार्थी जि. प. शाळांत

इंग्रजी माध्यमातून ११00 विद्यार्थी जि. प. शाळांत

googlenewsNext


कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५४७ विद्यार्थ्यांनी आपली मूळ शाळा सोडली आहे. यामध्ये २८९ इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला अनेक पालकांनी इंग्रजी माध्यम आणि खासगी शाळांमधील वातावरण पाहून पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे जिल्हाभर खासगी आणि इंग्रजी शाळांची संख्याही भरमसाठ वाढलीे. याचा विपरीत परिणाम जिल्हा परिषदांच्या शाळांवर झाला. मात्र, सध्या जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू ठेवल्याने या शाळांकडे कल वाढला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल विद्यार्थी
तालुका प्रवेशित इंग्रजी माध्यमातून खासगी शाळेतून एकूण
शाळा जि. प. शाळेत जि. प. शाळेत
आजरा ९ ३७ ११ ४८
भुदरगड १७ ५३ २४ ७७
चंदगड २२ ४४ १६ ६0
गडहिंग्लज ५२ १00 ७२ १७२
गगनबावडा ३ ५ 0 ५
हातकणंगले ३९ ८४ ८0 १६४
कागल ६२ १८३ 0 १८३
करवीर ८९ २८९ २५८ ५४७
पन्हाळा ३२ ६४ २६ ९0
राधानगरी ३६ ८0 १ ८१
शाहूवाडी २२ ७४ १३ ८७
शिरोळ ४२ १0६ ६८ १७४
एकूण ४२५ १११९ ५६९ १६८८



जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० टक्के डिजिटल शाळा, माध्यान्ह भोजन योजना, विज्ञान प्रयोगशाळा, इस्रो भेट असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रह धरला जात असून, याचाच परिणाम म्हणून जि.प.च्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
- अंबरीश घाटगे, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर
सर्व शिक्षा अभियान, ज्ञानरचनावादी शिक्षण, शाळाबाह्य व दिव्यांग बालकांच्या शिक्षणाची सुविधा अशा अनेक योजनांमुळे पालकांची मानसिकता बदलत आहे. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षेचे निकाल उच्च दर्जाचे आहेत. या सगळ्यांचा विचार करून पालक निर्णय घेत असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रवेश होत आहेत.
- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: Through 1100 students of English Par. In schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.