शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार पाच जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 17:17 IST

लोकप्रियतेचा ‘माईल स्टोन’ ठरलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. यावर्षी कोल्हापुरात ५ जानेवारी २०२० रोजी महामॅरेथॉन रंगणार आहे; त्यासाठी उत्साहात नोंदणी सुरू झाली आहे; त्यामुळे या मॅरेथॉनमधील सहभागाची धावपटूंसह नागरिकांची प्रतीक्षा संपली आहे. नोंदणीची अंतिम मुदत २१ डिसेंबर आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार पाच जानेवारीलानावनोंदणी सुरू; विजेत्यांना मिळणार सहा लाखांची बक्षिसे

कोल्हापूर : लोकप्रियतेचा ‘माईल स्टोन’ ठरलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. यावर्षी कोल्हापुरात ५ जानेवारी २०२० रोजी महामॅरेथॉन रंगणार आहे; त्यासाठी उत्साहात नोंदणी सुरू झाली आहे; त्यामुळे या मॅरेथॉनमधील सहभागाची धावपटूंसह नागरिकांची प्रतीक्षा संपली आहे. नोंदणीची अंतिम मुदत २१ डिसेंबर आहे.क्रीडानगरी असलेल्या कोल्हापुरात गेल्या वर्षी या महामॅरेथॉनच्या दुसºया पर्वाला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. आकर्षक बक्षिसे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, अचूक नियोजन, आदी वैशिष्ट्ये असणारी ही महामॅरेथॉन कोल्हापूरची एक वेगळी ओळख बनली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक आहे; त्यामुळे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटू, नागरिक उत्सुक असतात, त्यांना प्रतीक्षा असते. त्यांची यावर्षीची प्रतीक्षा संपली आहे.

कोल्हापुरातील महामॅरेथॉनच्या तिसºया पर्वाचा प्रारंभ झाला आहे. येथील पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारीला पहाटे पाच वाजता या मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी) १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) या गटात होणार आहे.

तीन किलोमीटरची फॅमिली रन आणि पाच किलोमीटर अंतराचा गट असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी ‘डिफेन्स’ हा वेगळा गट (२१ किलोमीटर) ठेवण्यात आला आहे. या मॅरेथॉनमधील विविध गटांमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.नावनोंदणी या ठिकाणी कराया महामॅरेथॉनच्या सीझन २ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे. महामॅरेथॉनच्या सीझन ३ साठी आजच नोंदणी करा. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत दि. २१ डिसेंबर २०१९ आहे; त्यामुळे नोंदणीसाठी त्वरा करा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरात सुरू झालेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या माध्यमातून माझ्या फिटनेसची मुहूर्तमेढ मी खºया अर्थाने रोवली. त्यानंतर राज्यातील विविध १२ मॅरेथॉनमध्ये मी सहभागी झालो आहे. गेल्यावर्षी कोल्हापुरातील महामॅरेथॉनमध्ये कुटुंबीयांसह सहभाग घेतला. आरोग्याबाबत सजग करणारा ‘लोकमत’चा हा उपक्रम उल्लेखनीय आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त धावपटू, युवक-युवती, नागरिकांनी सहभागी व्हावे.- गणेश पाटील, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

‘लोकमत’ने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात महामॅरेथॉनचा एक चांगला उपक्रम सुरू केला आहे. कोल्हापूरमधील मॅरेथॉनच्या गेल्या दोन पर्वांमध्ये मी सहभागी होतो. या मॅरेथॉनचा अनुभव खूप चांगला आहे. महामॅरेथॉनमुळे धावपटू, नागरिकांमध्ये एक नवा जोश निर्माण झाला आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची जाणीव निर्माण झाली आहे. यावर्षीच्या मॅरेथॉनबाबत मी खूप उत्साही आहे. एक आरोग्यदायी अनुभव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे.- वैभव बेळगावकर, आयर्नमॅन

शुल्क कमी, बक्षिसे मोठी

  • प्रकार                                         शुल्क        (अर्ली बर्ड शुल्क)              असे मिळणार साहित्य
  • ३ किलोमीटर (फॅमिली रन)      ४०० रुपये           ४०० रुपये                      टी-शर्ट गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन)           ६०० रुपये            ५०० रुपये                     टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन)       १२०० रुपये       ११०० रुपये                      टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल,                                                                                                                        टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) १२०० रुपये          ११०० रुपये                   टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल,                                                                                                              टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये             १,००० रुपये                टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल,                                                                                                               टाईम चिप, ब्रेकफास्ट

 

 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनkolhapurकोल्हापूर