शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या तीन वर्षीय अन्वीने सर केले कर्नाटकतील सर्वोच शिखर, पहिली छोटी गिर्यारोहक

By संदीप आडनाईक | Updated: January 20, 2023 17:37 IST

१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशीच तिने हा जागतिक विक्रम केला

कोल्हापूर : कोल्हापूरच्या तीन वर्षीय चिमुकली अन्वी घाटगे हिने कर्नाटकातील मुल्यणगिरी हे सर्वोच्च शिखर सर केले. समुद्रसपाटीपासून १९२५ मीटर उंचीवरुन राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या जयंतीदिवशी तिने अभिवादन केले. कर्नाटकातील चिकमंगलुरु येथील हे शिखर सर करणारी ती पहिली छोटी गिर्यारोहक ठरली आहे. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशीच तिने हा जागतिक विक्रम केला आहे.समुद्रसपाटीपासून ६३१७ फूट उंचीवर हे कर्नाटकातील सर्वात उंच शिखर असलेल्या या ट्रेकच्या चढाईला अन्वीने आई अनिता आणि वडील चेतन घाटगे, मामा रोहन माने, हर्षदा माने, चिकमंगलूर वनविभागाचे वनसंरक्षक उमेश पाटील यांच्यासोबत १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता प्रारंभ केला. भर उन्हात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुल्यानगिरी शिखराच्या पायथ्याच्या सर्पदारी येथून शिखरापर्यंतचा तीन ते चार किलोमीटरचा हा ट्रेक तिने दुपारी अडीच वाजता दोन तास तीस मिनिटांत पार केला. तिथे पोहोचताच तिने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून परिसर दणाणून सोडला.आई अनिता, वडिल चेतन हे तिच्यासोबत ११ जानेवारी रोजी कोल्हापूरातून रवाना झाले. कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन, उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद, सागर गवते, प्रशासकीय अधिकारी डी.एन शिरसाळ यांनी तिला शुभेच्छा दिल्या. कर्नाटकातील मूल्यनगीरी सर करणारी अन्वी देशातील पहिली आणि सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे. चिक्कमंगलुरचे उपवनसंरक्षक एस प्रभाकरन यांनी तिला प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान केला.दक्षिण भारतातील सात किल्ले केले सरअन्वी यापूर्वी १४ जानेवारी रोजी केरळ राज्यातील चंद्रगिरीचा किल्ला, बेकल किल्ला, होसदुर्ग, १५ जानेवारी रोजी कन्नूरचा किल्ला, तेल्लीचेरी किल्ला, १७ जानेवारीला पल्लीपुरम् किल्ला, १८ रोजी म्हैसूरचा किल्ला. असे दक्षिणेत भारतातील सात किल्ले सर केलेले आहेत.

यंगेस्ट माऊंटनरचा सन्मान

दोन वर्षे ११ महिन्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केल्याने अन्वीचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड कमिटीने तिला एंगेस्ट माऊंटनर् हा किताब देऊन सन्मानित केले आहे. तिने पन्हाळगड, पावनगड, विशाळगड, शिवगड, सामानगड,पारगड, रांगणा, वल्लभगड तसेच खडतर वासोटा असे किल्ले सर केलेले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक