कोल्हापूर : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांचे दागिने व रोकड लंपास केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी तिघा सराईत संशयित महिलांना अटक केली. गीता दयानंद चौगले (वय ४५), विठाबाई नितीन चौगले (वय४६), रेश्मा दिनकर चौगले (वय ६५, सर्व रा. आळते ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांमध्ये या तिघींचा समावेश आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात पुण्याहून कोल्हापूरला एसटी बसमधून आलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स चोरीस गेल्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १४) गुन्हा दाखल झाला होता. याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता. तपास करताना रेकाॅर्ड वरील संशयित गीता चौगले, विठाबाई चौगले, रेश्मा चौगले या
मध्यवर्ती बसस्थानकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून या तिघांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (अंदाजे किंमत १ लाख ३० हजार) हस्तगत करण्यात आले. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे , सहायक फौजदार ननवरे, गुलाब चौगुले, कृष्णात पिंगळे, वसंत पिंगळे, सचिन देसाई, हिंदुराव केसरे, सोमराज पाटील, सुप्रिया कात्रट , सारिका मोटे यांनी केली.
फोटो : २००८२०२१-कोल- गीता चौगले (संशयित आरोपी)
फोटो : २००८२०२१-कोल-विठाबाई चौगले (संशयित आरोपी),
फोटो : २००८२०२१-कोल-रेश्मा चौगले (संशयित आरोपी)