शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

CoronaVirus Lockdown : गावी जाण्यासाठी तीन दिवसांत ३०० फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:43 IST

आमच्या घरात वडिलांची प्रकृती बरी नाही, त्यांना गावाकडे न्यायचे आहे, साहेब काहीतरी करून एक पास द्या, आमचा भाऊ पुण्यात अडकला आहे, त्याला कोल्हापुरात आणायचे आहे, त्यासाठी आम्हाला मदत हवी आहे, अशा सर्वाधिक तक्रारी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर गेल्या तीन दिवसांत आल्या आहेत.

ठळक मुद्देगावी जाण्यासाठी तीन दिवसांत ३०० फोनव्हॉटस्अ‍ॅप हेल्पलाईनकडे विनंती : नातेवाईकांची होत आहे घालमेल

प्रवीण देसाईकोल्हापूर : आमच्या घरात वडिलांची प्रकृती बरी नाही, त्यांना गावाकडे न्यायचे आहे, साहेब काहीतरी करून एक पास द्या, आमचा भाऊ पुण्यात अडकला आहे, त्याला कोल्हापुरात आणायचे आहे, त्यासाठी आम्हाला मदत हवी आहे, अशा सर्वाधिक तक्रारी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर गेल्या तीन दिवसांत आल्या आहेत.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या कालावधीत नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासह जिल्हा प्रशासनाकडून ५ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही सुविधा केली आहे.

गुरुवारपासून चोवीस तास हा व्हॉटस्अ‍ॅप सुविधा कक्ष सुरू आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ३० कर्मचारी काम करीत आहेत. तीन शिफ्टमध्ये याचे नियोजन असून आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे.

   https://www.facebook.com/SatejPatil/videos/202648851038528/

सर्वाधिक तक्रारी या पेशंटला बाहेर नेण्यासाठी किंवा बाहेरून आणण्यासाठी वाहनाकरिता पास मिळावा, तसेच आमचे नातेवाईक पुण्या, मुंबईत अडकले असून, त्यांना आणण्याची व्यवस्था करावी, आदी स्वरूपाच्या आहेत.

हे प्रमाण ५० टक्के इतके आहे. जीवनावश्यक वस्तू (भाजीपाला, किराणा दुकाने, औषध दुकाने) आपापल्या भागात कुठे उपलब्ध होतील, आरोग्याच्या तक्रारी, गॅस सिलिंडर संपले आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारींचे प्रमाणही २५ टक्के आहे. या तक्रारींबाबत वेळोवेळी पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी देसाई यांना माहिती दिली जात आहे.

नागरिकांना आपल्या तक्रारी व अडचणी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांकावर मांडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लोकांना चांगला उपयोग होत आहे. प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन त्यांना मदत क रण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.-नितीन बांगर, नोडल अधिकारी, व्हॉट्सअ‍ॅप नियंत्रण कक्ष

असे आहेत व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक93 56 71 65 6393 56 73 27 2893 56 71 33 3093 56 75 00 3993 56 71 63 00 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील