शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: "...म्हणून त्या दोघांची नावे लिहून तिने मृत्युला मिठी मारली"; CM फडणवीसांनी विधानसभेत सगळं प्रकरण सांगितलं
2
"वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक
3
IndiGo नं केले ८२७ कोटी रिफंड, पाहा कसं चेक करायचं Refund Status?
4
पती मेहुणीच्या प्रेमात पडला; आधी पत्नीचा मोठ्या रकमेचा विमा काढला अन्... ऐकून होईल संताप!
5
तुमची फ्लाईट लेट किंवा कॅन्सल झाली? मग तुम्हाला 'इतका' मोबदला मिळणे बंधनकारक! काय आहेत नवीन नियम?
6
Video: उद्धवसेनेनंतर आता मनसेनेही टाकला 'कॅश बॉम्ब'; PWD खात्यात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
7
"रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया
8
भारतीय रुपयाची होणारी घसरण चांगली बातमी आहे का? पाहा कोणाला होणार फायदा
9
लय भारी! आजी हरवली, नातवाने शक्कल लढवली; नेकलेसमधल्या GPS ट्रॅकरने घेतला शोध
10
"अक्षय खन्नाला ऑस्कर दिला पाहिजे...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर फराह खानची पोस्ट, अभिनेत्याने साकारलेला रहमान डकैत पाहून झाली थक्क
11
आता मेड इन इंडिया चिप्स जगभरात धुरळा उडवणार; इंटेल आणि टाटा यांची हा‍तमिळवणी, प्लॅन काय?
12
एव्हिएशन क्षेत्रात मोठी मागणी! कोणत्या एअरलाइनकडे किती पायलट? संसदेत आकडेवारी सादर
13
Astrology: आज सर्वार्थ सिद्धी योग; हनुमान कृपेने 'या' ५ राशींना मिळणार धन, यश आणि मोठी संधी!
14
...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)
15
तब्बल ९०० वर्ष जुनं शिव मंदिर का बनलं थायलंड अन् कंबोडियातील युद्धाचं कारण? पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची
16
शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?
17
Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
18
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला IMFने पुन्हा दिले अब्जावंधीचे कर्ज! अटी-नियमही केले आणखी कडक 
20
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्यास तीन महिने मुदतवाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:35 IST

 केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निर्णय

कोल्हापूर : जीएसटी वार्षिक रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी देशभरातील तमाम व्यापारी उद्योग जगताकडून सातत्याने होत होती. 31 ऑगस्ट 2019 अखेर असलेली ही मुदत तीन महिन्याने वाढवून ती 30 नोव्हेंबर 2019 करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सोमवारी रात्री दिली.

राष्‍ट्रीय स्‍तरावर जीएसटी प्रणाली लागू केल्यानंतर या प्रणालीमध्ये गेल्या दोन वर्षात विविध सुधारणा करण्यात आल्या. या नवीन सुधारणा सह रिटर्न भरण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती, परंतु या नवीन असलेल्या करप्रणाली अनुसार हे रिटर्न भरणे व्यापारी उद्योजक,कर सल्लागार यासाठीसुद्धा जिकिरीचे होते.

त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरची व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था  फिक्की, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.. विशेषतः महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थिती मुळे व्यापारी उद्योजकांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.

अशा परिस्थितीमध्ये दिलेल्या मुदतीत जीएसटीचे विवरणपत्र भरणे अत्यंत अवघड बनले होते. व्यापारी उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून ही मुदतवाढ देण्याचे आश्वासन पूर्ण केले असून आज यासंबंधीचे अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने त्यांचे दिनांक 26 ऑगस्ट 2019 चे आदेश क्रमांक 7/ 2019 अन्वये हा निर्णय जाहीर केला असून या निर्णयाचे देशभरातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक व कर सल्लागार स्वागत करीत असल्याची माहिती चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली

टॅग्स :GSTजीएसटी