शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

हातकणंगले मतदारसंघात तीन एमआयडीसी होणार, खासदार धैर्यशील माने यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 13:01 IST

जमीन संपादनाची कार्यवाही सुरू

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये अकिवाट येथे २५० एकर जागेवर टेक्स्टाइल झोन, तर अन्य तीन ठिकाणी एमआयडीसी सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जमीन संपादनाची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सातारा येथून म्हसवड मार्गे बंगळुरूकडे जाणार आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील गावांचा विकास झाला पाहिजे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तीन एमआयडीसी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील आवळी, डोनोली मिळून एक आणि खसातळी याठिकाणी दुसरे असे दोन, तर शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे एक एमआयडीसी होणार आहे. त्यासाठी ९० एकर जागा संपादित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.अकिवाट येथे टेक्स्टाइल झोन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २५० एकर जागा आरक्षित केली आहे. या टेक्स्टाइल झोनमध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित प्रोसेसर्स, सायझिंग, आदी सर्व उद्योगधंदे एकाच ठिकाणी येतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. सांगली जिल्ह्यातील आष्टा या ठिकाणीही एमआयडीसी होणार आहे. मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्कचे कामही गतीने सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांनी त्यामध्ये लक्ष घातले आहे. गावामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी उद्योगाशिवाय पर्याय नाही. निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माने यांनी सांगितले.

सरकारवर परिणाम नाहीआम्ही भाजपसोबत गेल्याने केंद्रातील सरकार पडलेही नसते आणि तरलेही नसते. कोणताही परिणाम या सरकारवर झाला नसता. मात्र, आम्ही सामान्य लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळण्यासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मग त्यासंदर्भात काहीही आरोप झाले तरी त्याची पर्वा नाही. जर मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर सत्तेशिवाय पर्याय नाही, असे माने यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी