शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Kalamba Gas Explosion: गॅसलाइनची 'एंडकॅप'; भोजणे कुटुंबाचा 'एंड'

By उद्धव गोडसे | Updated: September 12, 2025 19:50 IST

कंपनी कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा, कार्यपद्धतीवर प्रश्न

उद्धव गोडसेकोल्हापूर : पाइपलाइनने घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. अत्यंत जोखमीचे काम प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर सोपवून त्या कामाची वेळोवेळी खातरजमा करण्याची जबाबदारी एचपी ऑईल गॅस आणि त्यांच्या ठेकेदार कंपन्यांची होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आणि पाइपलाइन जोडणाऱ्या कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा कळंब्यातील भोजणे कुटुंबीयांच्या जीवावर बेतला. या घटनेमुळे कंपनीची कार्यपद्धती आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड व ऑईल इंडिया लिमिटेड या कंपनीकडून कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील घरांमध्ये पाइपलाइनने गॅस पुरवठा करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. शहरात जमिनीखालून गॅस पाइपलाइन टाकणे, मीटर आणि रेग्युलेटर जोडून देण्याचे काम कंपनीने पुण्यातील सीतामाता कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले आहे. तर या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी इडिप्लस इंजिनीअरिंग ग्लोबल प्रा. लि. कंपनीला दिली आहे.२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सीतामाता कन्स्ट्रक्शनचा कर्मचारी महंमदहुजेर हुजेरअली याने अमर भोजणे यांच्या घरात गॅस पाइपलाइनची जोडणी केली. मीटर जोडण्यापूर्वी पाइपलाइनला एन्डकॅप जोडली जाते. एन्डकॅप न जोडताच तो निघून गेला आणि मुख्य गॅस वाहिनीतून पुरवठा सुरू केला. हीच चूक दुर्घटनेला कारणीभूत ठरली. या एका चुकीने तिघांचा जीव गेला.

गंध नसल्याने समजलेच नाहीपाइपलाइनद्वारे येणाऱ्या गॅसला गंध नाही. त्यामुळे त्याची गळती झाल्याचे समजत नाही. भोजणे यांच्या घरात असेच घडले. वास येत नसल्याने गळती सुरू असल्याचे समजलेच नाही. यातच पावसामुळे घराच्या खिडक्या आणि मुख्य दरवाजा बंद असल्याने तिन्ही खोल्यांमध्ये गॅस साठला. रात्री घरातील लाइट बंद करताना अचानक प्रचंड स्फोट होऊन शीतल भोजणे, त्यांचे सासरे अनंत भोजणे, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका हे चौघे गंभीर जखमी झाले.कनेक्शन घेण्यास टाळाटाळदुर्घटनेनंतर कंपनीची कार्यपद्धती आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कळंब्यातील मनोरमा कॉलनीत बहुतांश रहिवाशांनी कनेक्शन नाकारले आहे. काही कुटुंबांनी जोडणी केलेले साहित्य काढून घेण्यास कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

गावाकडे जाण्याच्या घाईने जोडणीगणेशोत्सवासाठी कोकणातील देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या मूळ गावी जाण्याचे नियोजन भोजणे कुटुंबीयांनी केले होते. पुन्हा घर बंद असल्याने जोडणी राहून जाईल, या विचारातून त्यांनी २५ ऑगस्टला जोडणी केली. त्यानंतर अवघ्या चार तासांतच दुर्घटना घडली.