शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसून 2 ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 12:28 IST

गंगवेश परिसरात विसर्जन मिरवणुक सुरु असताना ब्रेक फेल झाल्याने के एम टी बस घुसली. यात 2 जणांचा बळी गेला आहे. रविवारी रात्री ८ च्या सुमारास गर्दीने गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने केएमटी बसवर हल्ला चढवला. या घटनेने परिसरात तणाव आहे.

ठळक मुद्देभर रहदारीच्या गंगावेश परिसरात अपघातसंतप्त जमावाने पेटवली बससहा जण जखमीसीपीआर चौकातील बसेस ही फोडल्या

कोल्हापूर, दि. १ : ताबूत विसर्जन मिरवणुकीत  रहदारीच्या गंगवेश  परिसरात ब्रेक फेल झाल्याने के एम टी बस घुसली. या अपघातात 2 जणांचा बळी गेला आहे. परिसरात मोठा तणाव असून संतप्त जमावाने बस पेटविल्याचे समजते.

रविवारी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात शहरातील गर्दीने गजबजलेल्या गंगावेश परिसरात झाला. घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने केएमटी बस वर  (एम एच ०९ बी सी २१६६)  हल्ला चढवला. या घटनेने परिसरात तणाव आहे.

ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बस खाली सापडून 2 जण  ठार झाल्याचे आनंदा राऊत यांच्यासह ६ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. हे सर्वजण राजारामपुरी येथील मातंग वसाहतीमधील असल्याचे समजते.

तानाजी साठे व सुजल अवघडे असे ठार झालेल्या दोन व्यक्तीचे नाव समजले असून संतप्त जमाव शासकीय रूग्णालयाकडे चालला आहे. बसचालकाला शिक्षा करा, अशा घोषणा ते देत आहेत. त्यांनी सीपीआर चौकातील काही बसगाड्या फोडल्या. ठार झालेले तानाजी साठे हे पंजाचे मालक आहेत.

रविवारी शहरात ताबूत विसराजां मिरवणूक होती या मिरवणुकीतील काही पंजे वाद्यांच्या गजरात पंचगंगा नदीकडे निघाले होते. त्याचवेळी शिवाजी चौकाकडून गंगावेश कडे निघालेल्या केएमटी बसचा ब्रेक निकामी होऊन मिरवणुकीत घूसली. ३ हजारहून अधिक लोकांचा जमाव घटनास्थळी आहे.

या वेळी येथे आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीची काच देखील या वेळी फोडण्यात अली. परिस्थिती तणावपूर्ण बनलेने जलद कृती दलाचे दोन तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत