शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

Kolhapur: गव्याची कारला धडक; राधानगरी येथे तिघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 15:48 IST

गव्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाय योजनाची गरज 

गौरव सांगावकर राधानगरी : निपाणी-देवगड राज्यमार्गावर राधानगरी पासून हाकेच्या अंतरावर सांगावकर मळ्या समोर सकाळच्या सुमारास बिथरलेल्या गव्याने अचानकपणे कोकणाकडे जाणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये कारमधील तिघेजण जखमी झाले. निलेश अर्जुन मर्गज (रा. सिंधुदुर्ग), महेश श्रीकांत पाटील, आकाश महेश पाटील (दोघे रा. कोल्हापूर) अशी जखमीची नावे आहेत. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.निलेश मर्गज, महेश पाटील, आकाश पाटील हे तिघे गाडी क्रमांक (एम एच ०९ जीएम ०७६२)मधून कोकणात निघाले होते. दरम्यान, राधानगरी पासून हाकेच्या अंतरावर सांगावकर मळ्यासमोर गव्याने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. धडकेत कारमधील तिघे जखमी झाले तर गाडीचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी वनपाल सूर्यकांत गुरव यांनी भेट देऊन जखमींना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वनविभागाकडून ठोस उपाय योजनेची गरजया आधी ही गव्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. राधानगरी तहसील कार्यालया पासून हाकेच्या अंतरावर हा मळा आहे. या परिसरात मानवी वस्तीत गव्याचा वावर असतो. गव्यांकडून वारंवार हल्ले होत असतात. हे हल्ले थांबविण्याकरीता वनविभागा कडून ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. जंगलातील पाणवटे आटले आहेत. उन्हामुळे पाण्याच्या शोधात गवे मानवी वस्तीत येतात. मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांबरोबर आत्ता पर्यटकांना देखील गव्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीforest departmentवनविभाग