शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कारचालकाकडे तीन तास कसून चौकशी ; बिष्णोई गँग किणी टोल नाका चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:27 IST

हुबळी आणि परिसरात ते दोन ते तीन दिवस राहून परत जात होते. दरम्यान, पोलिसांबरोबर चकमक होण्यापूर्वीच्या आदल्या दिवशी सोमवारी त्यांनी हुबळी येथे पार्टीही केल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे.

ठळक मुद्देजखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर एलसीबी ताब्यात घेणार

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून या टोळीचा शोध जोधपूर पोलीसही घेत आहेत; मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत आहेत. गॅगस्टार शामलाल याचे हुबळीमध्ये घर, शेती आणि गॅस एजन्सी आहे; त्यामुळे या ठिकाणी ही टोळी स्थिर होण्याच्या प्रयत्नात होती; त्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून ते कर्नाटकात वारंवार ये-जा करीत होते. अनेकदा खासगी वाहनाने ते हुबळी येथे दाखल झाले. हुबळी आणि परिसरात ते दोन ते तीन दिवस राहून परत जात होते. दरम्यान, पोलिसांबरोबर चकमक होण्यापूर्वीच्या आदल्या दिवशी सोमवारी त्यांनी हुबळी येथे पार्टीही केल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे.

राजस्थान, हुबळी ते पुणे अशी ड्रग्जची तस्करी करत असल्याचीही माहिती तपासात पुढे आली आहे. ही गँग ००७ या नावाने कार्यरत होती. चकमकीत गंभीर जखमी झालेला शामलाल हाच टोळीचा म्होरक्या असल्याचेही पुढे येत आहे. राजस्थानातून कारवाई करून कर्नाटकात स्थिर होण्याच्या तयारीत होती; त्यामुळेच ते वारंवार गेल्या सात महिन्यांपासून कर्नाटकात फेऱ्या मारत आहेत; मात्र मंगळवारी (दि. २८) रात्री झालेल्या चकमकीमुळे त्यांचा इरादा उधळला गेला.कारचालक श्रीरामकडे तीन तास कसून चौकशीपोलीस कोठडीत असलेला कारचालक श्रीराम याच्याकडे पोलिसांनी तीन तास कसून चौकशी केली. या चौकशीला त्याने थंडा प्रतिसाद दिला. त्याचे मोबाइल कॉल डिटेल्स, व्हॉटस अ‍ॅप, फेसबुक अकाउंटची माहिती घेतली आहे. त्याने दोन दिवसांच्या कालावधीत संपर्क केलेले कॉल डिटेल्स तपासले. त्याने यू ट्यूबवर पिस्तूल घेऊन नाचत असलेले फोटो, व्हिडिओ व्हायरल केले आहेत. यासंदर्भात राजस्थान पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्याची चौकशी करून या टोळीत कर्नाटक आणि पुणे येथील कोणी सहभागी आहे का, पुणे येथे तो कोणाशी अमली पदार्थांची विक्री करणार होता, याचा तपास सुरू केला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस