शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

तीन दिवसांच्या सुटीनंतर बँकांत उसळली गर्दी

By admin | Updated: March 14, 2017 18:40 IST

कामकाज सुरू; व्यवहारांना गती

तीन दिवसांच्या सुटीनंतर बँकांत उसळली गर्दीकामकाज सुरू; व्यवहारांना गतीकोल्हापूर : तीन दिवसांच्या सुटीनंतर कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांचे कामकाज मंगळवारी सुरू झाले. पैसे काढणे-भरणे, धनादेश जमा करण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. दुपारी दोन वाजेपर्यंत गर्दी दिसून आली.दुसरा शनिवार, रविवार आणि सोमवारी धूलीवंदनाच्या सुटीमुळे सलग तीन दिवस बँका बंद राहिल्या. यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून बँकांमधील कामकाज सुरू झाले. शहरासह जिल्ह्यातील बँकांच्या विविध शाखांमध्ये खात्यातून पैसे काढणे, भरणे आणि धनादेश जमा करण्याकरिता ग्राहकांनी गर्दी केली. त्यासह वीज बिल भरण्याकरिता काही बँकांमध्ये गर्दी दिसून आली. तीन दिवसांच्या सुटीच्या कालावधीत अनेकांना पैसे काढण्यासाठी एटीएमचा आधार घ्यावा लागला. ज्यांच्याकडे एटीएम नाहीत, त्यांना बँका सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. ज्येष्ठ नागरिक, निवृत्तिवेतनधारकांनी दुपारपर्यंत बँकेत हजेरी लावली. उन्हाचा तडाखा बसत असल्याने दुपारी दीडपूर्वीच अनेकांनी बँकेतील व्यवहार पूर्ण करण्यावर भर दिला. बँका सुरू झाल्याने बाजारपेठेतील व्यवहारांना काहीशी गती मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्हा अग्रणी बँक असणाऱ्या बँक आॅफ इंडियाच्या कोल्हापूर विभागात १९ इतक्या कॅश डिपॉझिट (पैसे भरणे) मशीन (सीडीएम) आहेत. यातील कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी बँक शाखेमध्ये सीडीएम कार्यान्वित आहेत. कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर, इचलकरंजी आणि विश्रामबाग (सांगली) येथे बल्क नोट अ‍ॅक्सेप्टर मशीन (बीएनए) कार्यान्वित आहेत. यातील व्हीनस कॉर्नर वगळता अन्य ठिकाणचे सीडीएम आणि बीएनएल कार्यरत आहेत. व्हीनस कॉर्नर परिसरातील बँकेच्या ई-गॅलरीतील बीएनएलमध्ये नव्या दोन हजार व पाचशेच्या नोटांचे कॅलिब्रेशन करण्याचे काम सुरू आहे. आठवडाभरात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती बँक आॅफ इंडियाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ प्रबंधक विनयकुमार मिश्रा यांनी दिली. (प्रतिनिधी)