गौरव सांगावकर लोकमत न्यूज नेटवर्क
राधानगरी : पश्चिम घाटाच्या परिसरात वाघ, अस्वल आढळल्याने राधानगरीच्या वन्यजीव वैभवात भर पडली असून, अभयारण्याची जैवविविधता अधोरेखित होत आहे. वाघ, अस्वल, बिबट्या यासारखे प्राणी आढळत असल्याने वन्यजीव अन्य साखळीत त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. राधानगरी- दाजीपूर परिसरात गत २ ते ३ वर्षांत वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ, बिबट्या या प्राण्यांचे छायाचित्र टिपले. अलीकडेच सुभेदार, रायबा, सरदार आणि राणोजी हे चार नर वाघापाठोपाठच १८ ते २९ मार्चदरम्यान तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. १८ ते २९ मार्च दरम्यान अस्वले कॅमेरात कैद झाली आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या टिपला होता. याच कालावधीत हसणे दाजीपूर परिसरात हत्तीही बराच काळ स्थिरावला होता. २०२२ मध्ये भारतातील सर्वात मोठे सदर्न बर्डविंग फुलपाखरू येथे आढळले. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये 'ल्यूनामॉथ' हे पतंग फुलपाखरू निदर्शनास आले. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये राधानगरी येथे 'सिग्नेचर स्पायडर' हा कोळी आढळला. ३५१.१६ चौरस किलोमीटर परिसर लाभलेल्या दाजीपूर अभयारण्याला महाराष्ट्र सरकारने १९५८ मध्ये संरक्षित अभयारण्य म्हणून अधिसूचित केले. त्यानंतर १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी परिसरातील जंगल क्षेत्राला अभयारण्यात समावेश करून घेतले. प्रामुख्याने गव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अभयारण्यात या वन्यजीवांमुळे समृध्दता अधोरेखित होत आहे.
अस्वलामुळे शिकार प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण
बिया पसरवून वनांचे पुनरुत्पादन करणे, शिकारी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून परिसंस्थेचा समतोल राखणे, मृत प्राणी खाऊन जंगल स्वच्छ ठेवणे, अशा महत्त्वपूर्ण भूमिका अस्वलं बजावतात.
हे पशूपक्षी आढळले..
भेकर, साळींदर, अजगर, रानडुकरे, खवल्या मांजर, कोल्हे, शेकरू, रानकोंबड्या, पन्ना कबूतर, हॉर्नबिल, स्वर्गीय नर्तक हे पशुपक्षी आढळून येतात.
Web Summary : Radhanagari's wildlife thrives with bears, tigers, and leopards. Recent camera traps captured three bears, highlighting the area's rich biodiversity. These animals play a vital role in maintaining the ecosystem's balance within the sanctuary.
Web Summary : राधानगरी के वन्यजीवों में भालू, बाघ और तेंदुए फल-फूल रहे हैं। हाल ही में कैमरे के जाल में तीन भालू कैद हुए, जिससे क्षेत्र की समृद्ध जैव विविधता उजागर हुई। ये जानवर अभयारण्य के भीतर पारिस्थितिकी तंत्र का संतुलन बनाए रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं।