पेठवडगाव : सावर्डे (ता. हातकणंगले) येथील दत्त विकास सेवा व शिवक्रांती विकास संस्थेतील ९७ लाख ४४ हजार ४४३ रुपयांच्या अपहारप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असता, दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली.
नितीन विष्णू चव्हाण, संतोष गुलाबराव पाटील, भैरवनाथ मगदूम (रा. सावर्डे) अशी त्यांची नावे आहेत. या दोन्ही संस्थेत लेखापरीक्षण करण्यात आले. त्यानंतर लेखापरीक्षक अनिल पैलवान, रघुनाथ भोसले यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी ३ नोव्हेंबर २०१९ ला गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना न्यायाधीश सी. एस. देशपांडे यांच्यासमोर उभे केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार करीत आहेत.