आपटे नगरात पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:04+5:302021-07-31T04:26:04+5:30

कोल्हापूर : आपटेनगरात तिघेजण शिवीगाळ करून भांडण करीत असता त्यांना हटकले असता गस्तीवरील पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानास ...

Three arrested for pushing police in Apte | आपटे नगरात पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना अटक

आपटे नगरात पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना अटक

Next

कोल्हापूर : आपटेनगरात तिघेजण शिवीगाळ करून भांडण करीत असता त्यांना हटकले असता गस्तीवरील पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानास धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. याबद्दल तिघाजणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल मनोहर परीट, रोहित मनोहर परीट ( दोघे रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट) असिफ देसाई (रा. जीवबा नाना पार्क) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

शुक्रवारी दुपारी आपटेनगरात जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी संजय मासरणकर व गृहरक्षक दलाचे जवान पाटील हे दोघे पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान संशयित तिघेजण आपटे नगरातील एका बार समोर दंगामस्ती व शिवीगाळ करीत रस्त्यावर भांडणे करीत असल्याचे दिसून आले. त्यांना भांडण करू नका, घरी जा असे सांगताच त्या तिघांनी कर्तव्यावरील मासरणकर व पाटील यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून संशयितांना पोलिसांनी अटक केली. तपास प्रीतम मिठारी करीत आहेत.

३००७२०२१ कोल -राहुल परीट

३००७२०२१ कोल रोहित परीट

३००७२०२१ कोल असिफ देसाई

( कोल डेस्क मेल केला आहे)

Web Title: Three arrested for pushing police in Apte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.