शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील फोटोची धमकी देऊन युवतीवर अत्याचार, दिल्लीतील विवाहित तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:12 IST

लग्नात काढलेले फोटो अश्लील बनवून बदनामीची धमकी देत नात्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्लीतील विवाहित तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित धर्मेंद्र रामनिवास निषाद (वय ३५, रा. मंगोलपुरी, न्यू दिल्ली) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देअश्लील फोटोची धमकी देऊन युवतीवर अत्याचार दिल्लीतील विवाहित तरुणाला अटक

कोल्हापूर : लग्नात काढलेले फोटो अश्लील बनवून बदनामीची धमकी देत नात्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्लीतील विवाहित तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित धर्मेंद्र रामनिवास निषाद (वय ३५, रा. मंगोलपुरी, न्यू दिल्ली) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, बिहार येथील युवतीचे आई-वडील कामानिमित्त अनेक वर्षांपासून कोल्हापुरात आले आहेत. ते शिरोली एम. आय. डी. सी. येथील कारखान्यात काम करतात. पीडित युवती वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे.

दीड वर्षापूर्वी नातेवाइकाच्या लग्नामध्ये तिची संशयित धर्मेंद्र निषाद याच्याशी ओळख झाली. यावेळी त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर या दोघांचे मोबाईलवर बोलणे व व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज होऊ लागले.

लग्नामध्ये संशयिताने आपल्या मोबाईलमध्ये तिच्यासोबत सेल्फी फोटो काढले होते. ते फोटो अश्लील बनवून तुझ्या घरातील लोकांना दाखवितो. तुझ्या वडिलांना ठार मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने माथेरान येथे नेऊन एका हॉटेलमध्ये दोन दिवस अत्याचार केला. त्यानंतर तो वारंवार कोल्हापूरला येऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करू लागला.

पीडित युवतीला त्याचे लग्न झाले असून, त्याचा पाच मुले असल्याचे समजताच धक्का बसला. तिने या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. तिला दिलासा देत त्यांनी शाहूपुरी पोलिसांत येऊन संशयितांविरोधात फिर्याद दिली. संशयित गुंड प्रवृत्तीचा असल्याने गेल्या दीड वर्षापासून युवती त्याचा अत्याचार सहन करीत होती.असा सापडला जाळ्यातपीडित युवतीने व तिच्या आई-वडिलांनी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची भेट घेऊन अत्याचाराची माहिती दिली. संशयित युवतीच्या व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज करीत होता. त्यानुसार त्याला कोल्हापूरला येण्यास सांगितले. तो नेहमीप्रमाणे रविवारी कोल्हापुरात आला. येथील एका हॉटेलवर उतरल्यानंतर युवतीला मॅसेज केला. त्यानंतर पोलिसांनी युवतीची फिर्याद घेऊन तत्काळ हॉटेलवर जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर