शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदानाच्या तटबंदीला धोका; एक बाजू कोसळली, दुसरी बाजू उतरविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:54 IST

सभोवतालची ११० झाडे तोडणार, मजबुतीकरणाचे काम सुरू

कोल्हापूर : येथील ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानाच्या मजबूत तटबंदीला धोका निर्माण झाल्यामुळे मैदानभर लावण्यात आलेली अशोकाची ११० झाडे तोडण्यास महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली आहे. यापैकी आठ झाडे काढून ती अन्यत्र लावण्यात आली आहेत, ती जिवंत राहतात का हे पाहून अन्य झाडे काढण्याची आणि अन्यत्र पुनर्ररोपण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.महानगरपालिकेच्या मालकीचे राजर्षी शाहू खासबाग मैदान संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे चर्चेत आले. तेथील दुरवस्था दिसून आल्या. आगीची घटना घडण्याआधीच सहा-सात महिन्यांपूर्वी मैदानाची दक्षिणेकडील तटबंदी कोसळून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळीही मैदानाच्या तटबंदीची तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली होती. मैदानभर लावण्यात आलेल्या अशोकाची झाडे ही या तटबंदीला धोका निर्माण करीत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.त्यामुळे महापालिका प्रशासनाने ही मैदानातील ११० झाडे काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यास वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत चर्चा होऊन तोडण्यास मान्यता देण्यात आली. ही झाडे अन्यत्र पुनर्ररोपण करण्यात यावीत, अशी सूचनाही समिती सदस्यांनी केली. त्यानुसार एक महिन्यापूर्वी खासबाग मैदानाच्या उत्तर बाजूची भिंत कमकुवत झाल्यामुळे ती उतरविण्यापूर्वी आठ झाडे काढण्यात आली. यातील काही झाडे उद्यानात, तर काही झाडे नर्सरी बागेत लावण्यात आली आहेत. ती चांगली जगली आहेत.पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची आणखी काही दिवस वाट पाहून मैदानावरील झाडे तोडण्याची पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. सर्व झाडे महापालिका उद्यानातून लावण्यात येणार आहेत. कोणत्या ठिकाणी झाडे लावायची याचेही नियोजन उद्यान विभागाने केले आहे.खासबाग मैदानाची तटबंदी अतिशय मजबूत होती. परंतु, चुकीच्या पद्धतीने उलटा अशोकाची झाडे मैदानभर लावण्यात आल्याने त्याची मुळे भिंतीत घुसल्याने तटबंदीला धोका निर्माण झाला होता. काही ठिकाणी तटबंदीला तडे गेल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे मैदानाला धोका निर्माण करणारी झाडे काढूनच टाकावीत, असा निर्णय प्रशासनाने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतला आहे.

खासबाग कुस्ती मैदानविषयी 

  • बांधकाम प्रारंभ - १९०७
  • उद्घाटन तारीख - २० एप्रिल १९१२
  • पहिली कुस्ती - इमामबक्ष विरुद्ध मोईद्दीन – उद्घाटन दिवशी
  • प्रेक्षक क्षमता - अंदाजे ३०,०००
  • महत्त्व - भारतातील प्रसिद्ध कुस्ती आखाडा, सांस्कृतिक वारसा स्थळ

वारसा स्थळ -खासबाग कुस्ती मैदान हे भारतातील कुस्तीची दिशा बदलणारे एक ऐतिहासिक स्थळ आहे. १९०७ मध्ये बांधकामास सुरुवात करून ते २० एप्रिल १९१२ रोजी उद्घाटन झाले आणि तेव्हापासून ते कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र ठरले आहे.