शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

कोरोना संशयित शोधण्यासाठी मदत; कोल्हापूर हे देशातील पहिले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:02 IST

कोल्हापूर : कोरोना संशयित शोधण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या ‘चॅटबॉट’ या लिंकवर शुक्रवारपर्यंत एकूण ६७ हजार जणांनी माहिती नोंदविली आहे. ...

ठळक मुद्देचॅटबॉटचा वापर करणारे कोल्हापूर हे देशातील पहिले शहर‘चॅटबॉट’वर नोंदविली ६७ हजार जणांनी माहिती बाहेरून आलेल्या ७२ हजार जणांपर्यंत पोहोचली लिंक

कोल्हापूर : कोरोना संशयित शोधण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या ‘चॅटबॉट’ या लिंकवर शुक्रवारपर्यंत एकूण ६७ हजार जणांनी माहिती नोंदविली आहे. परजिल्हा, राज्यांतून कोल्हापूरमध्ये आलेल्या ७५ हजार जणांपर्यंत ही लिंक पोहोचली आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर कोरोना संशयित कोणी असेल तर त्याला लवकरात लवकर शोधणे व त्याची तपासणी आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार हा ‘चॅटबॉट’ बनविण्यात आला आहे.

अन्य जिल्हा, राज्यांतून कोल्हापूरमध्ये सुमारे ८० हजार लोक आलेले आहेत. त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे; पण त्यांच्यापर्यंत सातत्याने त्यांची माहिती घेणे आणि त्यामधील कोणाला काही लक्षणे दिसल्यास त्यावर लगेच वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे. त्याकरिता संबंधित ‘चॅटबॉट’ची मदत होत आहे. कोल्हापूरमध्ये दि. २७ मार्चपासून त्याचा वापर सुरू झाला. त्यामध्ये आतापर्यंत ६७ हजार जणांनी आपली माहिती नोंद केली आहे. अशा स्वरूपातील चॅटबॉटचा वापर करणारे कोल्हापूर हे देशातील पहिले शहर असल्याची माहिती त्याचे विकसक (डेव्हलपर) विनायक पाचलग यांनी शुक्रवारी दिली.माहिती भरून सहकार्य करावेपरजिल्हा, राज्यांतून कोल्हापूरमध्ये आलेल्या प्रत्येकाने आणि ज्यांना कोरोनाबाबतची कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास त्यांनी    http://www.kolhapurcollector.com/covid19   या लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी. ही माहिती नोंदवून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाचलग यांनी केले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस