शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘तूही रे’ एका धाग्यात गुंफल्या दोन प्रेमकथा

By admin | Updated: September 6, 2015 23:34 IST

लोकमत सखी मंचतर्फे गप्पाटप्पा : चित्रपटाच्या टीमने साधला ‘सखीं’शी मुक्त संवाद

कोल्हापूर : ‘तूही रे’ हा चित्रपट म्हणजे एकाच धाग्यात गुंफलेल्या दोन प्रेमकथा आहेत. एका तरुणाचा जबाबदार वडिलांपर्यंत झालेला प्रवास, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेली घटना मांडणारा हा चित्रपट आहे, अशा शब्दांत अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित यांनी सखी सदस्यांशी गप्पाटप्पा केल्या. येथील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी चित्रीकरणादरम्यानचे किस्से व चित्रपटाचा प्रवास उलगडला. यावेळी या चित्रपटाचे निर्माते आशिष वाघ उपस्थित होते. या चित्रपटाच्या प्रवासात ध्वनी व्यवस्थापक उमर फारुख, निर्मितीप्रमुख मिलिंद अष्टेकर यांनी विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. ‘सुंदरा’ गीताचे संगीतकार शशांक पोवार यांच्यावतीने त्यांचे बंधू रविराज पोवार यांनी सत्कार स्वीकारला. आपल्या भूमिकेविषयी स्वप्निल म्हणाला, सिद्धार्थ नावाच्या व्यक्तिरेखेचा महाविद्यालयीन तरुणापासून ते एक जबाबदार पिता होण्यापर्यंतचा प्रवास यात मांडला आहे. चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण नाही, तर दोन वेगवेगळ्या कथा एका धाग्यात गुंफल्या आहेत. सई ताम्हणकर म्हणाली, या चित्रपटात मी प्रत्येक स्त्रीच्या भावभावनांचे प्रतिनिधित्व करते. यातील माझी व्यक्तिरेखा ग्रामीण स्त्रीची आहे. त्यात मी सांगलीची असल्याने भूमिका करताना फार अडचण आली नाही. तेजस्विनी पंडित म्हणाली, ‘मी ‘भैरवी’ या गर्भश्रीमंत मुलीची भूमिका या चित्रपटात केली आहे, जी कडक शिस्तीची आहे; पण अबोल आहे.’ यावेळी प्रसिद्ध पाककलातज्ज्ञ मंदा आचार्य यांनी सखींसमोर गुजराती पदार्थांचे प्रात्यक्षिक सादर केले. (प्रतिनिधी)कोल्हापूरशी ऋणानुबंधया गप्पांमध्ये तीनही कलाकारांनी कोल्हापूरशी असलेला आपला ऋणानुबंध उलगडला. स्वप्निल जोशीने कोल्हापूरची माती, येथील वातावरण मला नेहमीच ऊर्जा देणारे असल्याचे सांगितले. तेजस्विनीने मी ‘सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटाचे येथेच चित्रीकरण केल्याचे मनोगत मांडले. सई ताम्हणकरने माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग येथील रंगमंचावर झाल्याचे सांगितले. भाग्यवान सखी सदस्या..या कार्यक्रमाचे प्रायोजक सिल्व्हर पॅलेस यांच्यावतीने सखी सदस्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. यातील दीप्ती सासने, सुलक्षणा सुभेदार, अनिता पाटील, मानसी कुलकर्णी, विमल चौगुले या भाग्यवान सखी सदस्यांना सिल्व्हर पॅलेसच्यावतीने चांदीची नोट भेट देण्यात आली. बाल विकास मंचच्या मानसी जरग, अथर्व पाटील, दिग्विजय शिंदे, रोहिणी वाकरेकर, सार्थक संकपाळ, साक्षी गायकवाड, रणधीर निपाणकर, सानिका साळोखे, आदिती कुलकर्णी, स्मित पार्टे या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ अंंतर्गत कलाकारांसोबत छायाचित्र काढण्याची संधी मिळाली.