शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : महाडिकांचे सगळे अर्थकारण ‘गोकुळ’वर चालतेय. ‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करण्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : महाडिकांचे सगळे अर्थकारण ‘गोकुळ’वर चालतेय. ‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करण्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. गोकुळ एकाच्या ताब्यात असून, तो सर्वसामान्य सभासदांच्या ताब्यात देण्यासाठी परिवर्तनाच्या लढाईला पाठबळ द्या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. पेठवडगाव येथे विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे प्रचार सभा झाली. यावेळी आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदचे अर्थ सभापती प्रवीण यादव, विजयसिंह माने, आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, महाडिकांचे अर्थकारण ‘गोकुळ’वर अवलंबून आहे. यामुळे कधीही रस्त्यावर न दिसणारे महाडिक गावोगावी फिरत आहेत. स्वत:च्या नावावर टँकर, जावयांच्या नावावर एजन्सी, वासांचे दूध व पशुखाद्यावर मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

आमदार राजू आवळे म्हणाले, जिल्ह्याची संस्था जिल्ह्यात राहिली आहे. मल्टिस्टेट झाले असते तर पश्चात्ताप करण्याची वेळ आली असती. यामध्ये कर्नाटक, इस्लामपूरचे मतदार वाढले असते. त्यामुळे सभासदांना किंमत मिळाली नसती. एकदा बदल घडविण्याची गरज आहे. सहकाराला प्रतिष्ठा देण्यासाठी एकवेळ संधी द्यावी तसेच मिणचेकर यांच्या रूपाने अठरा वर्षांनी तालुक्याला संधी मिळाली आहे. पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहतील. तसेच महाआघाडी म्हणून यापुढे एकत्र राहण्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मुरलीधर जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, नावेद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, रणजित पाटील, विद्याधर गुरबे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, महाबळेश्वर चौगुले, किसनबापू चौगुले, बायजी शेळके, अभिजीत तायशेट्ये, सुश्मिता पाटील, रंजना रेडेकर, अभिजीत माने, शिरोली सरपंच शशिकांत खवरे, सचिन चव्हाण, चेतन चव्हाण उपस्थित होते.

चौकट : तर कर्नाटकच्या सभासदांच्या जोरावर मलिदा खाणारेच मालक झाले असते

दूध उत्पादकांसाठीच्या लढाईत मल्टीस्टेटला विरोध करून या परिवर्तन लढाईची सुरुवात सभासदांना घेऊन केली आहे. सभासदांनी साथ दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे अन्यथा कर्नाटकातील सभासदांच्या जोरावर मलिदा खाणारेच मालक झाले असते. ही लढाई सत्तेसाठी नसून, दूध उत्पादकांना जादा दर देण्यासाठीची आहे. यामुळे आम्ही सर्वपक्षीय एकत्र आलो आहोत, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने यांचे सुपुत्र अभिजीत माने हे राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे प्रचार सभेत उपस्थित होते.