शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्याकांड सुनावणी : लॅपटॉपमधील मारहाणीचे व्हिडीओ तेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 15:03 IST

कोल्हापूर : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पनवेल न्यायालयात  सुनावणी झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यासमोर ...

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्याकांड सुनावणी : लॅपटॉपमधील मारहाणीचे व्हिडीओ तेच भाऊ आनंद बिद्रे यांची न्यायालयात माहिती

कोल्हापूर : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पनवेलन्यायालयात  सुनावणी झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यासमोर लॅपटॉपमधील मारहाणीचे व्हिडीओ आणि आॅडीओ तेच आहेत, अशी माहिती अश्विनी यांचे भाऊ आनंद जयकुमार बिद्रे यांनी दिली. न्यायालयाने त्यांच्याकडून या पुराव्यांबाबत खात्री करून घेतली. पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला आहे.बिद्रे हत्याप्रकरणाची पनवेल न्यायालयात न्यायाधीश अस्मर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत आणि अ‍ॅड. संतोष पवार यांनी युक्तिवाद करून बिद्रे हत्याकांडातील १३९ साक्षीदारांची यादी यापूर्वी सादर केली होती. त्या साक्षीदारांची तपासणी न्यायाधीश अस्मर यांच्यासमोर सुरू झाली आहे.

शुक्रवारी काही साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे यांना न्यायालयाने इनकॅमेरा जबाब घेतला. पोलिसांनी जप्त केलेल्या लॅपटॉपमधील व्हिडीओ, आॅडीओ दाखविल्या. त्यातील मारहाण, धमकी देणे हे व्हिडीओ तेच आहेत का, की पोलिसांनी बदलले आहेत, अशी विचारणा करून खात्री करून घेतली.

यावेळी उच्च न्यायालयात दाखल रिटपिटीशन आणि मुख्यमंत्री, पोलीस महांसचालक, नवी मुंबई कमिशनर यांना तपासातील दिरंगाईबाबत केलेली निवदने रेकॉर्डवर घेतली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा मित्र राजेश पाटील, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांची ओळख परेड झाली.

जप्त मुद्देमालाची सत्यता पडताळणी सुरू झाली आहे. अश्विनी यांची मुलगी सूची राजू गोरे हिची कस्टडी कोणाकडे आहे, याबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. त्यामुळे मुलगी सूची न्यायालयासमोर हजर होती. सुनावणीला पोलीस अधीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सो, संदीप वाघमोडे, सध्याचे तपास अधिकारी अजय कदम उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणMurderखूनCourtन्यायालयkolhapurकोल्हापूरpanvelपनवेल