शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

मुंबईच्या सुशिला साबळे यांना यंदाचे कुसुम पारितोषिक जाहीर, येत्या रविवारी कोल्हापुरात वितरण 

By विश्वास पाटील | Updated: February 7, 2024 17:09 IST

कोल्हापूर : ओल्या कचर्‍याचं परिसरातच खत केलं आणि विभाग पातळीवर बायोगॅस तयार केला तर मिथेन या विषारी वायूचे प्रमाण ...

कोल्हापूर : ओल्या कचर्‍याचं परिसरातच खत केलं आणि विभाग पातळीवर बायोगॅस तयार केला तर मिथेन या विषारी वायूचे प्रमाण कमी होईल आणि वातावरणातील तापमान कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होईल हे सांगणार्‍या आणि मुंबईत ’परिसर भगिनी विकास संघटने’च्या साडेतीन हजार स्त्रियांचं नेतृत्व करणार्‍या वेगवेगळ्या इमारतींमध्ये जाऊन तेथील लोकांना सुक्या ओल्या कचर्‍याच्या विभागणीचे महत्त्व पटवून देणार्‍या कचरावेचक ते पर्यावरण रक्षक ठरलेल्या सुशीला साबळे यांची यंदाच्या कुसुम पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. 51 हजार रुपये, शाल, बोधचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.आंतरभारती शिक्षण मंडळाच्या पल्लवी कोरगावकर, सुचिता पडळकर, तनुजा शिपूरकर, विनय पाटगावकर यांनी बुधवारी ही घोषणा केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष सरोज पाटील यांच्या हस्ते रविवार, दि. 11 फेब्रुवारीला वसंतराव चौगले पतसंस्था हॉल, शाहूपुरी, कोल्हापूर येथे या पुरस्काराचे वितरण सकाळी 11 वाजता होईल. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. प्रा. चंद्रकांत शंकर पाटगांवकर यांनी आयुष्यभर समतेचा विचार समाजामध्ये पोहोचवण्याचे कार्य केले. यांच्या मृत्युपश्चात आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शिल्लक रक्कम सोपविली. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आदी क्षेत्रात हिरिरीने भाग घेणार्‍या महिलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या हेतूने कुसुम पारितोषिक देण्यात येते. चंद्रकांत पाटगांवकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी ही रक्कम संस्थेकडे सुपूर्द केली. त्याच्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.  पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. या अगोदर मेळघाटमध्ये वैद्यकीय सेवा व बालकांचे कुपोषण याच्यावर काम करणार्‍या डॉ. कविता सातव यांना, सार्वजनिक स्वच्छतागृहांची महिलांसाठी मागणी करणार्‍या आणि राईट टू पी साठी काम करणार्‍या मुमताज शेख, तसेच आर्थिकदृष्ट्या स्त्रियांना स्वावलंबी बनवून आत्मभान देणार्‍या कांचनताई परुळेकर, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महिलांची बँक काढलेल्या मेधा पुरव-सामंत, नर्मदा बचाव आंदोलनालासाठी काम करणार्‍या सुनीती सु. र., माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनोरुग्णांसाठी काम करणार्‍या डॉ. सुचेता धामणे, अनेक आजी-आजोबांना आई होऊन सांभाळणार्‍या डॉ. अपर्णा देशमुख, ट्रान्सजेंडर समूहाच्या प्रतिनिधी दिशा पिंकी शेख, ट्रकचालक, देहविक्रय करणार्‍या महिलांसाठी काम करणार्‍या सोलापूरच्या सिमा किणीकर यांना या अगोदरचे पुरस्कार दिले आहेत. या कार्यक्रमासाठी जरूर यावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर