शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'धीस इज धंगेकर' कोल्हापुरात झळकले बॅनर, कसब्याच्या निकालातही मंत्री चंद्रकांत पाटील पडले तोंडघशी

By विश्वास पाटील | Updated: March 4, 2023 14:06 IST

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत मंत्री पाटील यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याचे चॅलेंज जोरदार गाजले होते

कोल्हापूर : आपल्या वादग्रस्त विधानाने कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत पराभव ओढवून घेतलेले भाजपचे नेते उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही तोंडघशी पडले. तिथे मंत्री पाटील यांनी 'व्हू इज धंगेकर' अशी विचारणा मतदारांना केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.

मात्र निकालानंतर काँग्रेस समर्थकांनी धीस इज धंगेकर This is Dhangekar असे प्रत्युत्तर देत पाटील यांनी ट्रोल केले. याचे लोण कोल्हापुरातही पाहायला मिळाले. अन् आता थेट धीस इज धंगेकर This is Dhangekar चे बॅनर झळकले. शहरातील कावळा नाका चौक परिसरात महाविकास आघाडीकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.गतवर्षी एप्रिलमध्ये झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत मंत्री पाटील यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याचे चॅलेंज जोरदार गाजले होते. मतदारांनी पैसे घेतल्यास त्यांची ईडीकडून चौकशी करणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांचे प्रत्येक विधान वादग्रस्त बनले व त्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली.कसबा पेठमधील एका सभेतही त्यांनी असेच चॅलेंज केले होते. विरोधी उमेदवाराची लायकी काढणारे हे चॅलेंज होते. ते त्यांना चांगलेच महागात पडले. त्यामध्ये ते म्हणतात, गेली दहा-बारा दिवस प्रचारात मी वारंवार ऐकतोय की धंगेकर विरुद्ध रासणे. व्हू इज धंगेकर..? त्याला निकालानंतर धंगेकर यांच्या जल्लोषानेच पुणेकरांनी प्रत्युतर दिले. पब्लिकची डिमांड ती... तो भाऊ को आना पडा... साऱ्या पुण्यात इतिहास घडला... पायरी यशाची एकेक चढला... विरोधकांचा धुरळा उडला... बघा कार्याचा प्रकाश पडला... आला आला रवींद्र धंगेकर आला... हे आला जयराम आला...च्या चालीवरील गाणे जोरदार व्हायरल झाले. आता कळलं का... व्हू इज धंगेकर... फक्त घाम नाही... बालेकिल्ला फोडलाय... कसबा तो एक झाकी है... कोथरूड अभी बाकी है... चंद्रकांत हटावो... बीजीपी बचाओ, अशाही मीम्स पुण्यात जोरदार व्हायरल झाल्या.कसबा पेठेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ११ हजार ४०० मतांनी विजयी झाले. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्याच जयश्री जाधव १९ हजार ३०७ मतांनी विजयी झाल्या. साम, दाम, दंड, जाती-धर्माचे राजकारण, पोलिस खात्याचा वापर ही सगळी ताकद लावूनही कोल्हापूर पाठोपाठ पुणेकरांनी भाजपला पराभूत केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसchandrakant patilचंद्रकांत पाटील