शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

'कोल्हापुरात असं कधीच घडलं नाही, सर्वांनी सलोख्याने राहावं; शाहू महाराज छत्रपतींची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 14:08 IST

काल कोल्हापुरात झालेल्या गोंधळानंतर आज शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली.

काल कोल्हापूरात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले. सुरुवातीला संयमी भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी नंतर मात्र आक्रमक भूमिका घेत लाठीमार, तीन ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविले. दगडफेकीत चार पोलिसांसह १५ जण जखमी झाले. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी सुमारे ५० तरुणांना ताब्यात घेतले आहे. यावर आज कोल्हापुरचे शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

बंदला हिंसक वळण, कोल्हापुरात तणाव; घरे, दुकानांवर दगडफेक, जमावाला पांगवले

शाहू महाराज छत्रपती म्हणाले, कोल्हापुरात अशा घटना यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. जे घडलं ते योग्य नाही. सर्वांनी सलोख्याने राहिले पाहिजे. घडलेल्या घटनेचा वेगळ्या पद्धतीने तपास करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी सतर्क राहा, असंही शाहू महाराज म्हणाले. 

'अगोदर संभाजीनगर नंतर अहिल्यानगर आता कोल्हापूरात या अशा घटना घडल्या याची लिंक शोधली पाहिजे, अशी मागणीही शाहू महाराज यांनी केली.  राज्यात सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ही शासनाची आणि त्यात गृह खात्याची असते. मी या घटने संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.   

 कोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले. सुरुवातीला संयमी भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी नंतर मात्र आक्रमक भूमिका घेत लाठीमार, तीन ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविले. दगडफेकीत चार पोलिसांसह १५ जण जखमी झाले. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी सुमारे ५० तरुणांना ताब्यात घेतले आहे.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, शहरात शांतता आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेट्स मुस्लिम समाजातील दोन युवकांनी लावल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक देत छत्रपती शिवाजी चौकात जमण्याचे आवाहन केले होते. 

कोल्हापूर शहरात  खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते गुरुवारी (८ जून ) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ३१ तासांच्या कालावधीकरिता खंडित करण्याचे आदेश गृहविभागाच्या प्रधान सचिवांनी दिले आहेत.

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर