शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात तेरा नगरपालिका, नगरपंचायतींत तब्बल ४ हजार दुबार मतदार, तातडीने पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:41 IST

Local Body Election: दुबार मतदारांचे नाव यादीतून वगळता येणार नाही, पण...

कोल्हापूर : दुबार मतदारांवरून देशात रणकंदन माजले असताना, जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतींमधून ४ हजार १५० मतदारांची नावे संभाव्य दुबार यादीत आले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व नगरपालिका व नगरपंचायतींना या मतदारांची यादी पाठवण्यात आली असून बीएलओंमार्फत तातडीने त्याची पडताळणी करण्यास सांगितले आहे.नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजल्याने स्थानिक पातळीवर राजकीय रणधुमाळी सुरू झाली असली, तरी नगरपालिका, नगरपंचायतींच्या विभागाला मतदार यादीतील दुबार नावांचा ताण आहे. निवडणूक आयोगाने सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना संभाव्य दुबार मतदारांची यादी पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांची पडताळणी करून एकाच मतदारसंघात, एकच प्रभाग आणि एकाच केंद्रावर त्यांनी मतदान करावे यासाठी यंत्रणा राबवण्यास सांगितले आहे.

वाचा: १३ नगरपालिकांमध्ये राजकीय संघर्ष सुरु; नेत्यांसह मतदारांचाही लागणार कस 

कशी करणार पडताळणीही यादी त्या त्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. त्यांना कोणत्याही एका मतदार संघातील, एका प्रभागातील एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड मतदाराने करायची आहे. त्यानुसार मतदाराकडून तसा अर्ज भरून घेतला जाईल. अन्य ठिकाणी त्यांचे नाव असेल तर त्यापुढे स्टारचे चिन्ह असेल. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना हा दुबार मतदार असल्याचे लक्षात येईल.

तीन पर्याय

  • दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रभागांच्या मतदार यादीत नाव असेल तर एका प्रभागाची निवड.
  • एकाच प्रभागात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल, तर एका केंद्राची निवड.
  • वरील दोन्ही पर्यायाला मतदाराकडून प्रतिसाद नसेल, तर मतदार यादीतील नावापुढे दुबारचा शिक्का. मतदार मतदानासाठी आला, तर तेथेच त्यांचे मी या केंद्रावर मतदान करत असून, अन्य केंद्रांवर मतदान करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले जाईल, अशा तीन पातळींवर हे काम चालेल.

मतदार यादीत नाव असणारच..या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. महिन्याभरात निवडणूक असल्याने एवढ्या कमी वेळेत दुबार मतदारांचे नाव यादीतून वगळता येणार नाही. फक्त नावापुढे दुबारचे चिन्ह असेल. निवडणूक झाली की ही नावे मतदार यादीतून वगळली जातील.

एक-एक मत महत्त्वाचे असल्याने....स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये चुरस जास्त असते, मतदारांची संख्या कमी असते त्यामुळे एक-एक मत महत्त्वाचे असते. पोलिंग एजंट डोळ्यात तेल घालून असतात. एक जरी दुबार मतदार आढळला किंवा एकाने अन्य ठिकाणीदेखील मतदान केले, तर लगेच त्यावर आक्षेप घेतला जातो. त्यामुळे या निवडणुकांमध्ये दुबार मतदारांची संख्या कमी असते.

नगरपालिका : दुबार मतदार संख्या

  • जयसिंगपूर : १४८९
  • गडहिंग्लज : ७७०
  • हुपरी : ५१३
  • कागल : ३५८
  • शिरोळ : ३०४
  • आजरा : २१५
  • वडगाव : १५३
  • कुरुंदवाड : १४९
  • हातकणंगले : १०५
  • चंदगड : ३८
  • मुरगूड :३३
  • मलकापूर : १६
  • पन्हाळा : ७
  • एकूण : ४ हजार १५०
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: 4,150 duplicate voters found in municipal councils, verification underway.

Web Summary : Kolhapur's municipal elections face scrutiny as 4,150 potential duplicate voters are identified. Election officials are verifying the list, allowing voters to choose one voting location to prevent fraud. Names won't be removed before the election but will be marked.