शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी कोल्हापुरात लाजिरवाणे कृत्य, धार्मिक कार्यक्रमात तृतीयपंथींचा सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर धिंगाणा

By तानाजी पोवार | Updated: August 16, 2022 13:40 IST

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना कोल्हापूरात धार्मिक कार्यक्रमात अशा पध्दतीने धिंगाणा सुरु होता.

कोल्हापूर : पुरोगामी कोल्हापुरात लाजिरवाणी घटना समोर आली आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली तृतीयपंथींचा सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना काल, सोमवारी देवीचे जग आणण्याच्या मिरवणुकीत तृतीयपंथीनी हे अत्यंत लाजीरवाणे कृत्य केले. हातात सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर हा धिंगाणा सुरु होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरीकांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. त्याबाबत आज, मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात कायद्याचा भंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.शुक्रवार पेठेतील एका तालीम मंडळाच्यावतीने तिसऱ्या सोमवारचे निमित्त साधून देवीचे जग आणण्याची दरवर्षी प्रथा आहे. सोमवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी देवीच्या जगाचे सवाद्य मिरवणूक काढणायात आली. मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथीनी समाजाला लाजवेल अशा पध्दतीने हावभाव करत नृत्य केले. भर गर्दीतही स्टेजवर तृतीयपंथी हातात सिगरेटचा धूर काढत धुम्रपान करत डॉल्बीच्या ठेक्यावर हा सारा नृत्याचा धिंगाणा सुरु होता.पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण..विशेष म्हणजे, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरात धार्मिक कार्यक्रमात अशा पध्दतीने धिंगाणा सुरु होता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी हा सारा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. पण आज आमचा दिवस आहे, आम्हाला रोखायचे नाही अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले, त्यामुळे पोलीसह हतबल झाल्याचे अनेकांनी सांगितले.

शिवसेनेची कारवाईची मागणीपंचगंगा तालीम मंडळाच्यावतीने अशा धार्मिक सोहळ्यात छोटी वस्त्रे परिधान करुन अश्लिल हावभाव करत तृतीयपंथींना नाचवले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षि छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर हा नंगानाच व व्यवसनाधीन कार्यकर्त्यांचे कृत्य हिंदू धर्माच्या भावाना दुखावणारे आहे, त्यामुळे संयोजकावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनिल मोदी, रविकिरण इंगवले, सन्वयक हर्षल सुर्वे आदी शिष्ठमंडळाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांना दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransgenderट्रान्सजेंडरdanceनृत्य