शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बिलंदर चोरट्यांकडून व्यापाऱ्यांचा तिसरा डोळा लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 17:41 IST

cctv Crimenews Ajra Kolhapur : चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी आजऱ्यातील बहुतांशी दुकानात व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात चोर्‍यांचे प्रमाण घटले आहे. परंतु बिलंदर चोरट्यांनी व्यापार्‍यांचा हा तिसरा डोळा लंपास केला आहे. त्यामुळे आजऱ्यातील दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देबिलंदर चोरट्यांकडून व्यापाऱ्यांचा तिसरा डोळा लंपासआजऱ्यातील दुकानदारांमध्ये खळबळ

सदाशिव मोरेआजरा  : चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी आजऱ्यातील बहुतांशी दुकानात व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात चोर्‍यांचे प्रमाण घटले आहे. परंतु बिलंदर चोरट्यांनी व्यापार्‍यांचा हा तिसरा डोळा लंपास केला आहे. त्यामुळे आजऱ्यातील दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.गुन्हेगारी व सुरक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व चोरट्यांच्या बारीक हालचाली टिपण्यासाठी आजरा शहरात २५ मोक्याच्या ठिकाणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र त्याची वेळेवर दुरूस्ती न केल्यामुळे हे सीसीटीव्ही गेल्या दोन वर्षापासून बंद आहेत.

मात्र आजऱ्यातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये व दुकानाच्या बाहेर चोरीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र चोरट्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे लंपास करून पोलिसांसह दुकानदारांसमोर तपासाचे आव्हान तयार केले आहे. दुकानदारांच्या सीसीटीव्हीमुळे आजरा शहरातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसात व्यापार्‍यांचा हा तिसरा डोळा बिलंदर चोरट्यांनी लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे.आजरा शहरातील लकमेश्वर इलेक्ट्रिकल्स, महाळसा ट्रेडर्स व कापड बाजार यासह अन्य दुकानांसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी असणारे सीसीटीव्ही म्हणजे तिसरा डोळा आजऱ्यात चोरट्यांनी पळविला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे रात्री २ ते ४ या वेळेत चोरट्यांनी नियोजनबध्द उचकटून व कटरच्या साह्याने केबल तोडून लंपास केले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरात फक्त चोरट्यांचे हात व निळा फुल की शर्ट दिसतो. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले असते मात्र हेच सीसीटीव्ही बंद आहेत.

लोकसहभागातून बसविलेले आजरा शहरातील २५ सीसीटीव्ही कॅमेरे नगरपंचायत व पोलीस खात्याने तातडीने दुरुस्त करून सुरू करावेत. अशी मागणी शहरातील व्यापारी वर्गातून होत आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर