शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या गळ्यातील चांदीच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

By सचिन भोसले | Updated: September 22, 2023 17:40 IST

संभाजी नगरातील घटना : अर्धा किलो चांदीच्या हाराचा समावेश.

सचिन भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क,  कोल्हापूर :  संभाजीनगर रेस कोर्स नाक्यावरील आयडियल स्पोर्ट्स क्लब मंडळाच्या गणेश मूर्तीच्या अंगावरील अर्धा किलो वजनाचा चांदीचा हार चोरट्याने लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० ते ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी कार्यकर्ते झोपायला होते. मात्र, चोरट्याने पाळत ठेवून कार्यकर्ते नसल्याचे संधी साधत ही चोरी केली. याबाबत फेऱ्या याबाबतची फिर्याद मंडळाची कार्यकर्ते सिद्धार्थ संजय पाटील (वय २२, संभाजीनगर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली.

संभाजी नगरातील रेस कोर्स नाक्यावरील आयडियल स्पोर्ट्स क्लब या मंडळाच्या मंडपात गणेश उत्सवानिमित्त गणेश मूर्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मूर्तीवर  अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचा अर्धा किलो वजना चा तीन फूट लांबीचा व मध्यभागी मोठे पेंडल व त्यावर लाल रंगाचा खडा व दोन्ही बाजूस लहान फुले असलेला ती चांदीच्या साखळीने जोडलेले  असलेला हा हार घालण्यात आला होता. मंडळाचे कार्यकर्ते २४ तास मंडपात असतात मात्र, शुक्रवारी सकाळी ते स्नान करून येण्यासाठी गेले असता चोरट्याने ही संधी साधत चांदीच्या हारावर डल्ला मारला. ही बाब स्नान करून आलेल्या कार्यकर्त्यांना समजल्याने परिसरात गोंधळ उडाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. याबाबतचा गुन्हा पोलिसात नोंद झाला  आहे. या चोरीची घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने तपासात सुरुवात केली आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सवCrime Newsगुन्हेगारी