शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

‘ते’ तीन कोटी चोरीचे

By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST

चिक्कोडीत छापे : कर्नाटकातील खासदाराच्या संस्थेच्या पैशावर डल्ला मारल्याची मैनुद्दिन मुल्लाची कबुली; ‘टिपर’चे नाव निष्पन्न

सांगली : मिरजेतील भाडेकरूच्या घरात सापडलेले तीन कोटी कर्नाटकातील एका खासदाराच्या संस्थेत भरायला जाणाऱ्या वाहनातून चोरल्याची कबुली अटकेत असलेल्या मैनुद्दिन ऊर्फ मोहिद्दीन मुल्ला याने दिली आहे. त्याच्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी चिक्कोडी येथे छापा टाकून चौकशी केली; पण कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे पथक सायंकाळी सांगलीत हात हलवत परतले. दरम्यान, न्यायालयाने मुल्लाला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जाखले (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील मैनुद्दिन मुल्ला याने प्रेमविवाह केल्यानंतर, तो पत्नीसह त्याची मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये राहणारी मेहुणी रेखा भोरे हिच्याकडे राहत होता. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्या मुल्लाच्या राहणीमानात गेल्या आठ दिवसांत बदल झाला होता. नव्या कोऱ्या बुलेटवरून तो फिरत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या पँटच्या खिशात सव्वालाख रुपये सापडले होते. तो बेथेलहेमनगरमध्ये राहत असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याच्या मेहुणीच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तीन कोटी सात लाख ६३ हजार पाचशे रुपयांची रोकड मेहुणीच्या घरात सापडली होती. झोपडीवजा या घरात एवढी रक्कम सापडल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली होती. त्याने ही रक्कम कोठून आणली? याची चौकशी सुरू आहे. कर्नाटकात एका खासदाराची संस्था आहे. या संस्थेच्या चिक्कोडी शाखेत आठवड्याला खासगी वाहनातून रक्कम भरायला नेली जाते, अशी माहिती मुल्लाला एका ‘टिपर’ने दिली होती. या माहितीच्या जोरावर त्याने या ‘टिपर’च्याच मदतीने, रक्कम नेत असलेल्या वाहनाचा पाठलाग केला. वाहन चिकोडीतील संस्थेसमोर थांबले असता, त्याने त्यातील तीन कोटी सात लाख ६३ हजार पाचशे रुपये चोरल्याची कबुली दिली. ही रक्कम त्याने ८ किंवा ९ मार्चला चोरली आहे. पण त्याला नक्की तारीख माहिती नाही. या माहितीच्या जोरावर त्याला घेऊन पथक रविवारी सकाळी चिकोडीला रवाना झाले होते. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे चिकोडी पोलीस ठाण्यात रक्कम चोरीला गेल्याची नोंद आहे का, याची माहिती घेतली. मात्र, तशी कोणतीही चोरीची घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चिकोडीतील संस्थेतही पथक जाऊन आले. परंतु तेथील संस्था बंद होती. तसेच तिथे सीसीटीव्ही कॅमेराही नाही. कोणतीही माहिती न मिळाल्याने पथक सायंकाळी हात हलवत परतले. (प्रतिनिधी)मैनुद्दीन मुल्लाची आई अनभिज्ञकोडोली : मैनुद्दीन मुल्ला हा जाखले येथे क्वचितच येत होता. घरी येण्याचे त्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले होते. काही काळ पारगाव, (ता. हातकणंगले) येथे तो वास्तव्यास होता. त्यानंतर तो अन्यत्र राहण्यास गेला. त्याची आई मरियाबी हिच्याशी समक्ष भेटून एवढी मोठी रक्कम तुमच्या मुलाकडे पोलिसांना सापडली आहे, याबाबत तुम्हाला काय माहिती आहे का, किंवा यापूर्वी तुम्हाला त्याने कधी पैसे दिले होते का, अशी विचारणा केली असता त्याच्याकडे एवढी रक्कम सापडल्याबाबत मला काहीही माहीत नाही. तसेच त्याने आई, भाऊ, बहीण यांनी कधीही कसलीही आर्थिक मदत केली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याला तीन भाऊ व दोन बहिणी आहेत. एक भाऊ रिक्षा ड्रायव्हर आहे, तर दोन भाऊ रोजंदारी करून पोट भरतात. त्याचे सर्व भाऊ विभक्त असून, एक बहीण विधवा आहे. गूढ वाढले : मुल्लाविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात बेहिशेबी रोकड सापडल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने ही रक्कम कोठून आणली, याची खात्रीशीर माहिती अजूनही चौकशीतून उघड झाली नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पथक कदाचित आजही चिक्कोडीला जाण्याची शक्यता आहे.मुल्लाविरुद्ध चोरीचे गुन्हे मुल्लाविरुद्ध खडकी (पुणे), कोडोली (ता. पन्हाळा) या पोलीस ठाण्यांत दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेण्यासाठी पथक आज, सोमवारी कोल्हापूर व पुण्याला रवाना होणार आहे. पोलिसाच्या नावावर बुलेटमुल्लाकडून दोन नव्याकोऱ्या बुलेट जप्त केल्या आहेत. यातील एक बुलेट त्याने मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याच्या नावावर खरेदी केल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या पोलिसालाच भेट म्हणून तो ही बुलेट देणार होता, अशीही माहिती हाती लागली आहे. या पोलिसाचे नावही निष्पन्न झाले आहे. मात्र, अधिकृत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनीनकार दिला.‘टिपर’ मिरजेचा?मुल्लाला चिकोडीतील संस्थेच्या रकमेची माहिती देणारा ‘टिपर’ कोण? असा प्रश्न पथकाला पडला आहे. मुल्ला या टिपरचे पूर्ण नाव सांगत नाही. त्यामुळे त्याला शोधून काढणे आव्हानच आहे. त्याच्या मदतीने त्याने ही रक्कम चोरली आहे. रक्कम चोरली किती? याचेही आता गूढ निर्माण झाले आहे. कारण ‘टिपर’कडेही रक्कम असण्याची शक्यता आहे. हा टिपर मिरजेतील असावा, असा संशय आहे. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत.