शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नको कोरोनाचा संसर्ग, होवू दे खर्च; चारचाकी खरेदीकडे नागरिकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 14:53 IST

संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेऐवजी स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ...

संतोष मिठारी

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेऐवजी स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात दुचाकी, चारचाकी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या आठ महिन्यात रोज १५४ कोल्हापूरकरांच्या दारी नवी गाडी आली आहे. त्यामुळे वाहन विक्रीची गती वाढू लागली आहे.नोकरी, व्यवसाय, शेती, उद्योग आदी क्षेत्रातील कामासाठी स्वत:चे वाहन असावे, अशी मानसिकता कोल्हापूरकरांची झाली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांची मागणी वाढली आहे.यासह लग्झरियस सेगमेंटमधील चारचाकीच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी १५ टक्क्यांची वाढ आहे. चारचाकीची मागणी वाढली असली, तरी सेमिकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे त्यांच्या उत्पादनाची गती मंदावली आहे. त्यामुळे नव्या चारचाकीसाठी ग्राहकांना चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

महागड्या चारचाकींची क्रेझ

कोल्हापुरात महागड्या चारचाकींची मोठी क्रेझ आहे. त्यात अधिकतर २० लाखांपुढील लग्झरियस चारचाकींना चांगली मागणी आहे. या चारचाकींच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दक्षता म्हणून अनेक जण स्वत:चे वाहन खरेदी करत आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकींना मागणी वाढली आहे. सेमिकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे चारचाकींचे उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी होत आहे. कोल्हापूरच्या वाहन उद्योगातील उलाढालीची गती वाढत असल्याचे कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल चोरडिया यांनी मंगळवारी सांगितले.

नोव्हेंबरमध्ये खरेदीचा रेकॉर्ड

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी नोव्हेंबरमध्ये कोल्हापुरात सर्वाधिक ७७३० वाहनांची विक्री झाली आहे. त्यात दुचाकींची संख्या ६०८०, तर चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांची संख्या १६५० आहे.

मालवाहतूक ऑटोची विक्री वाढली

कोरोनामुळे कोल्हापुरात पॅसेंजर सेगमेंटमधील ऑटोरिक्षाची मागणी ३० टक्क्यांनी घटली, तर मालवाहतूक ऑटोरिक्षाची मागणी १५ टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सीएनजी ऑटोरिक्षा खरेदीकडे कल वाढत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पॅसेंजर सेगमेंटमधील ऑटोची मागणी वाढणे अपेक्षित असल्याचे कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे सचिव नीलेश कदम यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एकूण वाहने

एकूण चारचाकी वाहने : १,६७,०५५

१५ वर्षे जुनी चारचाकी वाहने : ४७,१७०

एकूण दुचाकी : १२,२१,८३७

१५ वर्षे जुनी दुचाकी वाहने : ३,६४,४००

एकूण व्यावसायिक वाहने : ७९,५४६

१५ वर्षे जुनी व्यावसायिक वाहने : ३३,३११

गेल्या आठ महिन्यांत वाढली वाहने : ३७,६५६

कोणत्या महिन्यात किती खरेदी?

महिना   दुचाकी   चारचाकी

एप्रिल    ११९२      १०५०

मे           ४           २९२

जून       ५०५४      ८९२

जुलै       ४५३४      १०८८

ऑगस्ट   ३३८०     १५७६

सप्टेंबर    ३२२९      १५४७

ऑक्टोबर  ४३२२   १७६६

नोव्हेंबर   ६०८०    १६५०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याcarकार