शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

ग्रामपंचायतीवर प्रशासक होणार, ११ हजार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 15:38 IST

राज्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करून त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निधी उभा करीत असल्याचे प्रकरण गुरुवारी पुढे आले. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबंधी १४ जुलैला पत्र पाठवून असे प्रशासक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ११ हजार रुपयांची बिनपरतीची ठेव पक्षनिधी म्हणून घेण्याचे सुचविले आहे. त्यातून राष्ट्रवादी कॉँग्रेस वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे. त्याच पक्षाचे नेते हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायतीवर प्रशासक होणार, ११ हजार द्यापुणे राष्ट्रवादीचा फंडा : जिल्हाध्यक्षांचे पत्र झाले व्हायरल

कोल्हापूर : राज्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करून त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निधी उभा करीत असल्याचे प्रकरण गुरुवारी पुढे आले. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबंधी १४ जुलैला पत्र पाठवून असे प्रशासक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ११ हजार रुपयांची बिनपरतीची ठेव पक्षनिधी म्हणून घेण्याचे सुचविले आहे. त्यातून राष्ट्रवादी कॉँग्रेस वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे. त्याच पक्षाचे नेते हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री आहेत.गारटकर पत्रात म्हणतात, पुणे जिल्ह्यात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत सरपंचपदाची मुदत संपलेल्या तब्बल ७५० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. तिची प्रक्रिया राबविण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबद्दल मार्गदर्शक सूचनाही शासनाने घालून दिल्या आहेत.

त्यांची अंमलबजावणी करीत सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये संबंधित उमेदवारांकडून अर्ज भरून घ्यावा व त्यासोबत त्याच्याकडून पक्षनिधी म्हणून बिनपरतीचा ११ हजारांचा निधी घ्यावा व हा निधी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खात्यामध्ये जमा करावा व त्याची पावती अर्जांसोबत जोडून ते सर्व अर्ज तालुकाध्यक्षांनी तारीखनिहाय २० जुलैपर्यंत जिल्हाध्यक्षांकडे दोन प्रतींत सादर करावेत.

यासोबत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते क्रमांक (१७१६००१७००००४२९७) आणि आयएफएससी कोडही देण्यात आला आहे. हा निधी सर्वच इच्छुक उमेदवारांकडून घेतला जाणार आणि निवड मात्र एकाच व्यक्तीची होणार, हे स्पष्टच आहे. त्याने खिशातील पैसे घालून हे पद मिळवावे आणि प्रशासक झाल्यावर ग्रामपंचायतीच्या कारभारातून ते पैसे काढावेत की काय, अशी विचारणा काही ज्येष्ठ सरपंचांनी केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत