शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

धामोड येथील तीनही प्रभागातील मतदान यंत्र बंद पडलेने कांही काळ तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 14:13 IST

निवडणूक विभागाच्या स्वतंत्र टीमने तात्काळ नवीन मशीन उपलब्ध करून दिल्याने तणाव निवळला व मतदान सुरळीत चालू झाले.

धामोड - धामोड (ता राधानगरी) येथे होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान चुरशीने सुरू आहे. सकाळच्या सत्रात मतदारांनीही मतदान केंद्रावर गर्दी केली होती. पण दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक तीन प्रभागातील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे मतदान केंद्रावर कांही काळ तणाव निर्माण झाला होता. पण निवडणूक विभागाच्या स्वतंत्र टीमने तात्काळ नवीन मशीन उपलब्ध करून दिल्याने तणाव निवळला व मतदान सुरळीत चालू झाले.

धामोड ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत पाच प्रभाग येत असून मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक चार मधील मतदान यंत्रे बंद पडली होती. पण निवडणुक विभागाने तात्काळ मशीन बदलल्याने मतदान पुर्ववत सुरू झाले. पण येथील अतिसंवेदनशिल असलेल्या प्रभाग क्रमांक पाचमधील मतदान यंत्र बंद पडल्यानंतर रांगेत उभा असलेल्या मतदारांनी व दोन्ही गटाच्या उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे येथील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदान यंत्रातील दोषांमुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागत आसल्याने मतदारांत थोडी नाराजी होती. मशीन बदलल्यानंतर येथील पाचही प्रभागात मतदान प्रक्रिया शांततेत सुरु झाली.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकVotingमतदान