शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘चौगले’ आडनावाबाबत अजूनही हीनता, चुकीची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:59 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळून येत नाही, अशा समाजाबद्दल आजही अशी भावना बाळगणे हे खरेतर एकूण मराठा समाजाच्या पायातील लोखंडी ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळून येत नाही, अशा समाजाबद्दल आजही अशी भावना बाळगणे हे खरेतर एकूण मराठा समाजाच्या पायातील लोखंडी बेडी बनून घट्ट बसली आहे.गेल्याच आठवड्यात करवीर तालुक्यातील एका तरुणाने ठरलेले लग्न मोडले म्हणून आत्महत्या केली. ‘तुमचे आडनाव चौगले आहे म्हणून स्थळ आम्हाला पसंत नाही,’ असा निरोप त्यांना आल्याचे सांगण्यात येते. लग्न ठरल्याच्या आनंदात असताना असा निरोप आल्याने त्याचा ताण न सहन झाल्याने त्याने जीवनयात्राच संपवली. मागच्या दोन दिवसांपूर्वी याच तालुक्यातील एका गावातील कष्टकरी तरुणाचेही लग्न ठरत आले होते. त्याचे आडनाव ‘साळोखे ऊर्फ चौगले’. कागल तालुक्यातील मुलीच्या नातेवाइकांनी ‘साळोखे ऊर्फ चौगले’ असे आडनाव समजल्यावर अन्य सगळ्या गोष्टी पसंत असतानाही स्थळास नकार दिला. त्या मुलासही त्याचा मानसिक धक्का बसला.ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे असून मुळात वधू-वर सूचक केंद्रात माहिती घ्यायला गेल्यावर ‘चौगले’ आडनाव असेल तर लोक बायोडाटाच हातात घ्यायला तयार नाहीत. त्यातही ‘चौगले’ आडनावाची सून करून आणतात; परंतु त्यांच्यात मुलगी द्यायला सहसा तयार नाहीत. पूर्वी गावगाड्यामध्ये पाटील, देशपांडे, इनामदार, मुसलमान व चौघला यांनाही मानकरी मानले गेले. काही ठिकाणी गावाची वेश राखण करणारा तो ‘चौघला’ असाही उल्लेख आढळतो. हे लोक मराठा समाजातीलच आहेत. त्यांचे गावात अळीला घर आहे. इतरांप्रमाणेच त्यांची शेतजमीन आहे म्हणजे तो देखील मराठा कुणबीच आहे.कधी तरी कुठल्या शतकात त्यांच्याबद्दल एखादा अपसमज पसरला गेला व तोच धरूनआजही आपण अशा जातीतील उच्च-नीचतेच्या भिंतीला कवटाळूनबसणार असू तर ‘एक मराठा...लाख मराठा...’ म्हणणे व्यर्थआहे.हे जरूर बघा..‘चौगले’ आडनाव असलेल्या मुलांमध्ये काही अनुवंशिक आजार असतील तर त्याबाबत जरूर हरकत घेतली जावी. त्याचे करिअर पाहावे. त्याचा रक्तगटही पाहावा. त्याची आर्थिक स्थिती, घरदार, सामाजिक वर्तन याबद्दल आग्रह धरावा व त्यानुसार अपेक्षापूर्ती होत नसेल तर जरूर स्थळ नाकारावे; परंतु निव्वळ ‘चौगले’ आडनाव आहे म्हणून स्थळ नाकारणे हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण मानले पाहिजे.सुशिक्षितच जास्त अडाणी..पूर्वीचे लोक ‘जाडे-भरडे बघा आणि सांभाळून घ्या,’ असे म्हणायचे परंतु आता शिकलेले लोकच जास्त अडाणी झाले असून ते कुळी, पदर, उच्च-नीचता याचा बाऊ करू लागले आहेत. त्यामुळे हा समाज पुढे निघाला आहे की मागे याचा विचार करण्याची गरज आहे.उलटे चित्र..लिंगायत-जैन समाजातही ‘चौगुले’ आडनावाचे लोक आहेत. लिंगायत समाजात हे आडनाव जास्त लोकांचे आहे; परंतु त्या समाजात ‘चौगुले’ आडनावाबाबत अशी भावना नाही. उलट त्या समाजात चौगुले यांना ‘पंचम’ म्हणजे उच्च कुळातील मानले जाते. आडनाव एकच परंतु दोन समाजात त्याबद्दल वेगवेगळी भावना आहे.