शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावर चांगल्या दर्जाचा रस्ता झाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 10:16 IST

गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावर पॅचवर्क नको तर तातडीने चांगल्या दर्जाचा रस्ता करा, अशी मागणी ‘आखरी रास्ता कृती समिती’च्या वतीने मंगळवारी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे केली. यावेळी महापौर लाटकर यांनी रस्त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली असून, निधी मिळताच चांगल्या दर्जाचा रस्ता केला जाईल. दरम्यान, तात्पुरता पर्याय म्हणून येथे पॅचवर्क करू, अशी ग्वाही दिली.

ठळक मुद्देगंगावेश ते शिवाजी पूल मार्गावर चांगल्या दर्जाचा रस्ता झाला पाहिजे‘आखरी रास्ता कृती समिती’ आक्रमक

कोल्हापूर : गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावर पॅचवर्क नको तर तातडीने चांगल्या दर्जाचा रस्ता करा, अशी मागणी ‘आखरी रास्ता कृती समिती’च्या वतीने मंगळवारी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे केली. यावेळी महापौर लाटकर यांनी रस्त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली असून, निधी मिळताच चांगल्या दर्जाचा रस्ता केला जाईल. दरम्यान, तात्पुरता पर्याय म्हणून येथे पॅचवर्क करू, अशी ग्वाही दिली.कृती समितीचे किशोर घाटगे म्हणाले, शिवाजी पूल ते गंगावेश हा मार्ग शहरातील प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ असते. येथे नेहमी पुराचे पाणी येत असल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य बनलेले आहे. सध्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या रस्त्याची डागडुजी न करता तो नव्याने करावा. यावेळी नगरसेवक शेखर कुसाळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेवक राजू लाटकर उपस्थित होते. तर कृती समितीचे राकेश पाटील, किशोर घाटगे, अरविंद ओतारी, डॉ. झुंझारराव पाटील, महेश कामत, सनी अतिग्रे, सुनील पाटील, मंदार जाधव, मोहसिन मणेर, सुरेश कदम, रियाज बागवान, दिग्विजय काटकर उपस्थित होते.सिमेंटचा रस्ता करणार : महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकरराज्य शासनाकडे महापुरामुळे खराब झालेले रस्ते करण्यासाठी १८0 कोटींचा निधी मिळावा, असा प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये शिवाजी पूल ते गंगावेश या रस्त्याचाही समावेश आहे. निधी मिळताच येथील रस्ते करण्यात येणार आहेत. यामध्ये सतत पुराचे पाणी असणाऱ्या पंचगंगा नदी ते पंचगंगा हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता सिमेंटचा होणार आहे. उर्वरित डांबरी रस्ता करण्यात येणार आहे.आता पुन्हा येणार नाही, थेट आंदोलनखराब रस्त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. रस्ता करण्यासाठी निवेदन, रास्ता रोको आंदोलन केले; मात्र काम सुरू झालेले नाही; त्यामुळे आता पुन्हा महापालिकेत रस्त्यासाठी येणार नाही, तर थेट आंदोलनच केले जाईल. महापालिकेला घेराओच घालू, असा इशारा किशोर घाटगे यांनी दिला. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अशोक जाधव यांनी महापौरांच्या केबिनमध्ये येऊन आंदोलकांची समजूत काढली.

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर