शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

भाजपचा गड भेदण्यासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मंगेशकर नगर या महापालिकेच्या ४४ क्रमांकाच्या प्रभागामध्ये यंदाही काँग्रेस आणि भाजपमध्येच सामना रंगण्याची चिन्हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मंगेशकर नगर या महापालिकेच्या ४४ क्रमांकाच्या प्रभागामध्ये यंदाही काँग्रेस आणि भाजपमध्येच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मंगळवार पेठेतील मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांची संख्या अधिक असणाऱ्या या प्रभागामध्ये काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र ती एकालाच मिळणार असल्याने या ठिकाणी उमेदवारी जाहीर होताना ऐनवेळी काही वेगळे चित्र दिसू शकते.

या प्रभागातील विजय सूर्यवंशी हे गेल्यावेळी भाजपकडून निवडून आले होते. विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी महापालिकेत काम पाहिले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे संदीप सरनाईक यांचा पराभव केला होता. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नगण्य मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवाराला येथे जादा मते मिळाली होती. सूर्यवंशी यांचा या परिसरात चांगला संपर्क आहे. त्यांनी रस्ते, पाणी, पाईपलाईन बदलणे यासाठीच्या कामांसाठी यंत्रणा सतत हालती ठेवली. मात्र कचरा उठावाच्या बाबतीत शिस्त लावण्यात ते कमी पडले, अशी तक्रार आहे. त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये गंजीवाले खणीच्या येथे म्हशी धुण्यासाठीचे केंदर उभारले. महालक्ष्मीनगरच्या समोरच्या बाजूस त्यांनी आधुनिक असा बसथांबा आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंदर उभारले. जुन्या आधार हॉस्पिटलजवळच्या चौकात दिशादर्शक स्तंभ, बेलबाग उद्यान उभारणी केली. त्यामुळे भाजपकडून विजय सूर्यवंशी यांच्या पत्नी हेमा यांच्या उमेदवारीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

या भागातील कार्यकर्ते शेखर जाधव हे याआधी दोन वेळा निवडणुकीला उभे राहिले होते. २००५ मध्ये विजय सूर्यवंशी यांनी त्यांचा ९९ मतांनी तर २०१० साली संभाजी जाधव यांनी ५९ मतांनी त्यांचा पराभव केला होता. या दोन निवडणुकीला जाधव हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे यावेळी त्यांनी पत्नी श्वेता यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात त्यांचे प्राधान्य काँग्रेसला आहे.

विद्यमान नगरसेवक संभाजी जाधव हे पत्नी सुनंदा यांना या प्रभागातून काँग्रेसकडून रिंगणात उतरवण्याच्या मानसिकतेत आहेत. भावजय म्हणून आमदार चंद्रकांत जाधव त्यांना मंगेशकरनगरमधून संधी देणार की संभाजी जाधव यांना महालक्ष्मी मंदिर येथून उमेदवारी देणार यावर येथील चित्र अवलंबून आहे. नेहमी युवकांच्या गराड्यात असणारा युवक काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष दीपक थोरात पत्नी प्रीतम यांच्यासाठी इच्छुक आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेसचे काम करत असल्याने त्याला उमेदवारीचा विश्वास आहे. हळदीकुंकू, आरोग्य शिबिर या माध्यमातून थोरात यांनी वातावरण निर्मिती केली आहे. या तिघांपैकी काँग्रेसची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

प्रभाग क्रमांक ४४

मंगेशकरनगर

विद्यमान नगरसेवक

विजय सूर्यवंशी

आताचे आरक्षण

सर्वसाधारण महिला

गतनिवडणुकीतील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

संदीप सुभाष सरनाईक काँग्रेस १६७२

विजय दिनकर सूर्यवंशी भाजप १९१६

शिवाजी कोंडिबा गवळी शिवसेना ३७२

धवल संजय आवटे अपक्ष १५२

अनिल बजरंग कुंभार राष्ट्रवादी ३४

कोट

मतदारसंघामध्ये चौफेर कामे केली आहेत. रस्ते, पाईपलाईन बदलणे ही कामे सातत्याने केली आहेत. रेणुका मंदिराकडील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम उभे राहून करून घेतले आहे. वेळीच लक्ष घातले नसते तर हा रस्ता अरुंद झाला असता.

विजय सूर्यवंशी

माजी विरोधी पक्षनेता

ही झाली आहेत कामे

या प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि गटारांची अनेक कामे झाली आहेत. ऑक्सिजन पार्क, आधुनिक बसथांबा आणि विरंगुळा केंदर, मंगेशकरनगरमधील खणीजवळ कॅटर सर्व्हिस सेंटर, दूध कट्टा आणि पार्लरची उभारणी, बेलबाग येथे बेलाच्या झाडांची लागवड आणि धार्मिक विरंगुळा केंदर ही कोल्हापूर शहरामध्ये प्रभागाचे वेगळेपण दर्शवणारी कामे केली आहेत. दिशादर्शक स्तंभ उभारला आहे.

हे आहेत प्रश्न

कचरा उठावाची समस्या कायम राहिली आहे. भक्तीपूजा नगर परिसरामध्ये आवश्यक त्या दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मंगेशकर नगरमधील उद्यान हे मद्यपींसाठी अड्डा झाल्याची तक्रार आहे. या ठिकाणी संध्याकाळी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज व्यक्त होत आहे.

११०३२०२१ कोल मंगेशकर नगर ०१/०२

मंगेशकरनगर प्रभागात हा आकर्षक दिशादर्शक स्तंभ उभारण्यात आला आहे. मात्र जवळच असणाऱ्या शाळेजवळील कोंडाळ्याची अशी स्थिती होती.