शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

हद्दवाढीत राजकारण नको

By admin | Updated: January 29, 2016 23:55 IST

हसन मुश्रीफ : ‘दालन’ उद्घाटनप्रसंगी लोकप्रतिनिधींनी मांडल्या भूमिका

कोल्हापूर : शहरातील पाणी हवे, बससेवा वापरली जाते; मग हद्दवाढीला विरोध कसला करता? शहराच्या विकासाची आवश्यकता लक्षात घेऊन हद्दवाढीबाबत मतांचे राजकारण करू नका. याबाबत सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे केले. त्यांनी नाव न घेता आमदार सतेज पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांना हद्दवाढीला सहकार्याचे आवाहन केले.‘क्रिडाई कोल्हापूर’ आयोजित ‘दालन २०१६’च्या उद्घाटन कार्यक्रमात कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत लोकप्रतिनिधींनी आपल्या भूमिका मांडल्या. यावेळी प्रारंभी ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी शहराच्या विकासासाठी हद्दवाढ आवश्यक असून, त्याला ‘क्रिडाई कोल्हापूर’चा पाठिंबा जाहीर केला. विविध समस्या सुटाव्यात यासाठी बांधकाम व्यावसायिक गेल्या २७ वर्षांपासून झटत असून, त्याकडे महापालिका, शासनाने लक्ष द्यावे, त्यासह लॅडरअभावी रखडलेल्या इमारतींच्या उंचीचा प्रस्ताव, इझी डुइंग कमिटीची स्थापना, रेंटल टॅक्स कमी करावा, विमानसेवा सुरू व्हावी, आदी मागण्या मांडल्या. यावर आमदार सतेज पाटील यांनी हद्दवाढीबाबत संबंधित ग्रामीण भागातील लोकांना पहिल्यांदा विश्वासात घ्यावे, त्यांना हद्दवाढीचे सकारात्मक परिणाम समजावून सांगण्यासाठी ‘क्रिडाई कोल्हापूर’ने पुढाकार घ्यावा, असे सांगितले. आमदार चंद्रदीप नरके यांनी शहराच्या विकासासाठी हद्दवाढ हा एकमेव पर्याय नसल्याचे सांगितले. जबरदस्तीने हद्दवाढ केल्यास तिला विरोध केला जाईल. शहरालगतच्या शेती व्यवसायाच्या जमिनी कायम ठेवून विकास आराखडा तयार करता येईल का, हे पाहावे. यावर आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शहरालगतच्या एक किलोमीटर परिघात हद्दवाढ करण्यास हरकत नाही. याबाबत सामोपचाराने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी हद्दवाढीला पाठिंबा जाहीर केला; पण त्यांनी हद्दवाढीचा निर्णय जबरदस्तीने घेण्यात येऊ नये. याबाबत संबंधित गावांमधील लोकांना विश्वासात घ्यावे. हद्दवाढीत त्यांची गावे आल्यानंतर होणाऱ्या विकासाचा विश्वास त्यांना द्यावा, असे सांगितले. हद्दवाढीला पाठबळ‘दालन’ प्रदर्शनाला सायंकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी केले. यानंतर क्रिडाई कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढ, रूपांतरित कर, एलबीटी, आदी मुद्यांवर मंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे. त्यासाठी पाठबळ दिले जाईल. औद्योगिक वसाहती वगळून हद्दवाढ करण्याचा विचार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. तसेच घरफाळा, रूपांतरित कर आणि एलबीटीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.भाजपवाले काही करीत नाहीतपालकमंत्री, गृहनिर्माणमंत्री उपस्थित नसल्याने आम्ही आमच्या मागण्या आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे मांडत असून, त्यांनी त्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. त्यावर आमदार हसन मुश्रीफ यांनी शिवसेनावाल्यांचे भाजपवाले काही ऐकत व काही करीत नसल्याची कोपरखळी हाणली. त्याला उत्तर देताना आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचे कोणी ऐकत नसेल तर त्याला ते कशा पद्धतीने ऐकायला लावून करायला भाग पाडते, हे शिवसेनेने टोलच्या माध्यमातून दाखवून दिल्याचे सांगितले. हद्दवाढ कागलपर्यंत जात नसल्याने मुश्रीफसाहेबांचा तिला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.