शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

व्यावसायिकांसाठी अजून खूप काम करायचे आहे : भरत ओसवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 17:21 IST

माझ्या सराफ व्यावसायिकांसाठी अजून मला खूप काम करावयाचे आहे; ेत्यासाठी मी झटण्यास सदैव तयार असल्याचे प्रतिपादन मावळते अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले.

ठळक मुद्देव्यावसायिकांसाठी अजून खूप काम करायचे आहे : भरत ओसवाल सराफ संघाच्या संचालक मंडळास निरोप

कोल्हापूर : माझ्या सराफ व्यावसायिकांसाठी अजून मला खूप काम करावयाचे आहे; ेत्यासाठी मी झटण्यास सदैव तयार असल्याचे प्रतिपादन मावळते अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले.कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या द्विवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानिमित्त संस्थेत विद्यमान पदाधिकारी आणि संचालक मंडळाचा निरोप सभारंभ झाला, त्यावेळी ओसवाल यांचा गणेशप्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पदाधिकारी, संचालकांचा करवीरनिवासिनी अंबाबाईची प्रतिमा देऊन गौरव केला.

ओसवाल म्हणाले, २२ जानेवारी २०१७ रोजी संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आणि संस्थेच्या माध्यमातून माझा सभासद कसा सक्षम कसा होईल, त्याला नवतंत्रज्ञानाची ओळख व्हावी, हाच ध्यास घेतला. ग्राहक मेळावा, लाभम्, आभूषणम् अशा कार्यक्रमांचे आयोजन केले. जीएसटी, बदलते कायदे यांची जाणीव सभासदाला कार्यशाळेच्या माध्यमातून करून दिली. सभासदांसाठी मला सर्वांच्या सहकार्याने अजून खूप काम करावयाचे आहे.यावेळी उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन, विजय हावळ, संचालक जितेंद्र राठोड, अनिल पोतदार, शिवाजी पाटील, रवींद्र राठोड यांनीही मनोगतातून ओसवाल यांना शुभेच्छा दिल्या. संचालक धर्मपाल जिरगे, किरण गांधी, संजय चोडणकर, नितीन ओसवाल, महेंद्र ओसवाल, बाबासाहेब खाडे, उमेश शेळके, विक्रम कुलकर्णी, शुभम माने, सुरेश चौगले, आदी उपस्थित होते.

जीजेसी अध्यक्षपद, गोल्ड क्लस्टरसंचालक रवींद्र राठोड यांनी, भरत ओसवाल यांची आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या (जीजेसी) अध्यक्षपदी निवड होऊन येथील व्यावसायिकांच्या कक्षा रुंदविण्यास त्याचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अनिल पोतदार यांनी, ओसवाल यांच्या हस्ते गोल्ड क्लस्टरचा प्रस्ताव पूर्णत्वास जाऊन यशोशिखरावर असलेला येथील व्यावसायिक पुन्हा यशाचे शिखर गाठू दे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर