शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धरणाला जमीन देऊन आम्ही उपाशी; वरची गावे मात्र तुपाशी

By भीमगोंड देसाई | Updated: August 7, 2023 16:54 IST

आंबेओहळ धरणाची स्थिती : वर्षापूर्वी पूर्ण, अजूनही पुनर्वसन अपूर्ण

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : दीर्घकाळ अर्धवट राहिलेले आजरा तालुक्यातील आंबेओहळ धरण वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र, अजूनही सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. या धरणाच्या पाण्याचा फायदा घेणारे शेतकरी तुपाशी आणि धरणासाठी जमीन दिलेले शेतकरी उपाशीच राहिले आहेत. पुनर्वसनासाठी शासकीय यंत्रणेकडे हेलपाटे मारून त्यांच्या चपला तुटत आहेत.आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा आहे. तरीही आंबेओहळ धरणातील सर्व बाधीत शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. धरणाला सन १९९८ मध्ये मंजुरी मिळाली. तब्बल २३ वर्षांनी धरण पूर्ण झाले. राजकीय इच्छाशक्ती, रखडलेल्या पुनर्वसनासह विविध कारणांनी अनेक वर्षे धरणाचे काम अपूर्ण राहिले होते. गेल्या वर्षी धरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण अजूनही शंभर टक्के पुनर्वसन झालेले नाही.

धरणाचे नाव : आंबेओहळ, ता. आजरा.धरणासाठी ५१४ शेतकऱ्यांची जमिनीधरणासाठी ५१४ शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पोलिस बळाचा वापर करून जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या आहेत.मोबदला मिळाला अन् खर्चही झालाजमीन धरणात गेल्याने मोबदल्यापोटी २२ कोटी ६६ लाख वाटप करण्यात आले आहेत. मात्र, अनेकांचे पैसे विविध कारणांसाठी खर्च झाले आहेत.धरणाच्या पाण्याखालचे क्षेत्र किती ?प्रकल्प पाणीसाठ्याची क्षमता १२५० द.ल.घ.फू. इतकी आहे. यातून गडहिंग्लज तालुक्यातील २६१५ हेक्टर, तर आजरा तालुक्यातील १३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.१३२ शेतकऱ्यांचे पुनर्वसन प्रलंबितधरणासाठी जमिनी दिलेल्या ५१४ पैकी १३२ शेतकऱ्यांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही. त्यांनी पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. पण, त्यांचे पुनर्वसन बेदखलच केले आहे.धरण उशाला, कोरड घशालाधरणात पाणी साठत आहे. मात्र, ते उपसून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याची योजना नाही. लाभक्षेत्रातील सर्व जमिनीला पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. धरणापासून जवळ असलेल्या गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण