शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिक-माने यांना बदलायचे कारण नाही, पण..; खासदार धनंजय महाडिकांचे सुचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:51 IST

भाजपने येणाऱ्या लोकसभेसाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे तयारी सुरू केली

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे सध्याचे खासदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. सध्या शिंदे गट, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि आम्ही भाजप एकत्र आहोत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला हे दोन्ही उमेदवार बदलायचे तसे काही कारण वाटत नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे सांगितले. मात्र याचा निर्णय दिल्लीतच होणार, हे सांगायला ते विसरले नाहीत.संसदेतील कामगिरीबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांना आगामी लोकसभा उमेदवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, अजून लोकसभेसाठी वेळ आहे. परंतु सध्या दोन्ही खासदार शिंदे गटाचे आहेत. हे दोघेही विद्यमान असल्याने त्यांना बदलण्याचे तसे कारण दिसत नाही. परंतु शेवटी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नियोजन करतील आणि त्याबाबतचा निर्णय दिल्लीत होईल.

प्रत्येक पक्ष उमेदवारीसाठी आग्रही असतो. त्याप्रमाणे अनेक मागण्याही होत आहेत. परंतु अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार आहे. भाजपने येणाऱ्या लोकसभेसाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSanjay Mandalikसंजय मंडलिकDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक