शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचे निकष अस्पष्ट, तरी 'लाडक्या बहिणीचा' हट्ट; शासन स्तरावरच संभ्रम 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 2, 2024 16:04 IST

सुधारीत अधिसूचनेची शक्यता, मुदत मात्र १५ दिवसांची

इंदुमती गणेशकोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलच शासन स्तरावर मोठा संभ्रम असताना, मोजून पंधरा दिवसांत ही याेजना राबवण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. योजना लाभासाठीचे निकष अजून स्पष्ट नाहीत. सरसकट सर्व महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे की, आर्थिक निकष लागू आहेत, अविवाहित मुलींना रक्कम मिळणार का, जातीची अट आहे का, एकाच कुटुंबातील तीन चार मुली-महिला असतील, तर त्या सगळ्यांना लाभ मिळणार का, असे योजनेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील २१ वर्षांवरील मुली व महिलांसाठी जाहीर केली. महिलांना दरमहा १५०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. मात्र, योजना राबविण्याबाबत शासन-प्रशासन स्तरावरच मोठा संभ्रम आहे. अनेक कुटुंबात एकापेक्षा जास्त मुली असतात, गृहिणी असतात. त्या सगळ्या महिला अनुदानासाठी पात्र ठरणार का, हे अधिसूचनेत सांगितलेले नाही. यासह अनेक प्रश्न असल्याने अधिसूचनेत बदल होण्याचीच शक्यता अधिक आहे.

मुलींचे काय करणार ?या अधिसूचनेत २१ वर्षांवरील विवाहिता, विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, निराधार महिला, असे लिहिले आहे. मग २१ वर्षांवरील मुलींचे काय करणार? हे यात स्पष्ट नाही.

१५ दिवसांत दाखले कसे मिळणार?योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त १५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर तात्पुरती यादी, हरकती, अंतिम यादी आणि अनुदान खात्यावर जमा करणे ही सगळी प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. एवढ्या कमी वेळेत कोणतेच दाखले मिळत नाहीत.

आचारसंहितेआधीची धडपडविधानसभेची आचारसंहिता ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कसेही करून योजना सुरू करण्यासाठीच ही धडपड सुरू आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या महिलांना तातडीने लाभ द्यायचा प्रयत्न आहे.

अर्ज ग्रामसेवक व अंगणवाडी सेविकांकडेया योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे, पण अजून ते सॉफ्टवेअरच तयार झालेले नाही, त्यामुळे सध्या ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांकडे छापील अर्ज भरून द्यायचे आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी योजनेसंबंधीच्या अडचणी मांडल्याने सुधारीत अधिसूचना येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारWomenमहिला