शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

साखर मूल्यांकनात ९० रुपयांची वाढ

By admin | Updated: April 6, 2016 00:42 IST

राज्य बँकेचा निर्णय : तीन महिन्यांत ४०० रुपयांची वाढ; साखर कारखान्यांना दिलासा

प्रकाश पाटील -- कोपार्डे साखर दराची चढती कमान साखर उद्योगाला अर्थिक दिलासा देणारी ठरली आहे. साखर मूल्यांकनात राज्य बँकेने मंगळवारी प्रतिक्विंटल ९० रुपयांनी वाढ करून ते २९७५ रुपये केले. या मूल्यांकनाच्या ८५ टक्के म्हणजे कारखान्यांना २५२८ रुपये ७५ पैसे प्रतिक्विंटल उचल मिळणार आहे. गेल्या तीन महिन्यांत मूल्यांकनात झालेली वाढ प्रतिक्विंटल ४०० रुपयांची आहे. साखरेचे दर घसरलेले असल्याने आॅक्टोबर २०१५ मध्ये राज्य बॅँकेने केलेले साखर मूल्यांकन २१९० रुपये प्रतिक्विंटल होते. मात्र, जानेवारी २०१६ नंतर साखरेच्या दरात वाढ सुरू झाली. जानेवारीमध्ये साखरेचा दर एक्स फॅक्टरी २७०० रुपये प्रतिक्विंटल होता. यामुळे २५७५ रुपये मूल्यांकन करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये हे दर पुन्हा ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल वाढले म्हणून मूल्यांकनात पुन्हा वाढ करून २६५५ करण्यात आले. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात यात १०५ रुपयांची वाढ करून २७६५ करण्यात आले. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात साखरेचे दर ३४०० रुपयांवर गेल्याने पुन्हा यात १२० रुपयांची वाढ करून २८८५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आले. सध्या साखरेचा दर प्रतिक्विंटल ३५०० ते ३८०० रुपये एक्स फॅक्टरी आहे. यामुळे बॅँकेने साखर मूल्यांकनात मंगळवारी पुन्हा ९० रुपयांची वाढ करून ते २९७५ रुपये केले आहे. या मूल्यांकनाच्या ८५ टक्के म्हणजे २५२८ रुपये ७५ पैसे प्रतिक्विंटल उचल बँकेकडून कारखान्यांना मिळणार आहे. राज्य सहकारी बँकेच्या या धोरणामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने शॉर्ट मार्जिनमधून बाहेर जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा १२.५० टक्के आहे. एक टन उसापासून कारखान्यांना १२५ किलो साखर मिळत असून, साखर मूल्यांकनाने एक टनासाठी तीन हजार १६० रुपये ९३ पैसे मिळणार आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांची सरासरी एफ. आर. पी. २५०० ते २६०० असल्याने आता कारखाने शॉर्ट मार्जिनमधून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे ८०:२० पैकी उर्वरित २० टक्के एफ . आर. पी. देण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. गेल्या चार महिन्यांपासून साखर मूल्यांकनाचा लेखाजोखामहिनासाखर मूल्यांकन वाढ (प्रतिक्विंटल रुपये)(रुपयांत)डिसेंबर २३८५११५जानेवारी २०१६२५७५१९०फेब्रुवारी२६५५८०मार्च (पहिला आठवडा)२७६५११०मार्च (शेवटचा आठवडा)२८८५१२०५ एप्रिल२९७५९०