शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर कोल्हापुरात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. मागील हंगामात उत्पादीत झालेल्या साखरेपैकी ६५ टक्के म्हणजेच ११ लाख ४१ हजार टन साखर शिल्लक असल्याने कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सर्वाधिक साखर १ लाख ५८ हजार टन ‘जवाहर’ कारखान्याकडे असून, ‘कुंभी’कडे ९१ हजार टन साखर पडून असून, हंगाम तोंडावर आल्याने या साखरेचे करायचे काय? असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे.

गेले तीन-चार हंगाम साखर कारखानदारी दुष्टचक्रातून जात आहे. साखरेचा दर प्रतिक्विंटल ३,१०० आणि ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर असल्याने गणित बिघडल्याने कारखानदारांची दमछाक होत आहे. मागील २०२०-२१ हा हंगाम सुरु करण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे ६ लाख ७७ हजार ५५६ टन साखर शिल्लक होती. त्यामध्ये १७ लाख ५५ हजार ७७० टन साखरेचे उत्पादन झाले. त्यातून १ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१पर्यंत १२ लाख ९२ हजार २३८ टन साखरेची विक्री झाली. त्यामुळे आता तब्बल ११ लाख ४१ हजार ८७ टन साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. राज्याला ३० ते ३५ लाख टन साखर वर्षाला लागते. त्यामुळे राज्याला किमान सहा महिने पुरेल इतकी साखर सध्या कोल्हापुरात पडून आहे.

प्रत्येक कारखान्याला अडीच कोटी व्याजाचा भुर्दंड

साखर गोडावूनमध्ये पडून असली तरी त्यावर व्याज सुरु आहे. पोत्याला (१०० किलो) दिवसाला १ रुपया व्याजापोटी द्यावा लागतो. त्यामुळे केवळ व्याजावर प्रत्येक कारखान्याला किमान दोन ते अडीच कोटींचा भुर्दंड पडतो. बँकांकडे शिल्लक असलेली १० टक्के उचल ही व्याजपोटीच जाते.

दीड लाख टन साखर उघड्यावर

दोन वर्षांच्या साखरेने गोडावून फुल्ल झाल्याने मागील हंगामात कारखान्यांनी उघड्यावर साखर ठेवली होती. अनेक कारखान्यांची या पावसातही साखर तशीच आहे. साधारणत: दीड लाख टन साखर उघड्यावर असून, पावसामुळे तिचे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

निर्यात कोटा २५ लाख टन वाढविणे गरजेचे

केंद्राने राज्यासाठी साखरेचा ६० लाख टन निर्यात कोटा दिला होता. तो संपला असून, साखरेची गोडावून मोकळी करण्यासाठी किमान २५ लाख टन निर्यात कोटा देण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे.

कोट-

साखरेची समस्या पाहता, १५० रूपये वाहतूक अनुदानाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या साखर २,७५० रुपये क्विंटल आहे. केंद्राने साडेतीनशे रुपये अनुदान दिले तर बऱ्यापैकी मार्ग निघू शकतो.

- पी. जी. मेढे (साखर उद्योगातील तज्ञ)

कारखानानिहाय शिल्लक साखर टनात -

कारखाना साखर

वारणा ६५,१४०

भोगावती ५५,७२२

राजाराम ४०,६४७

शाहू ७२,६९६

दत्त, शिरोळ ८३,२८२

बिद्री ७४,७८०

नलवडे, गडहिंग्लज ३४,६९७

जवाहर १,५८,५८२

मंडलिक, हमीदवाडा ३७,७७३

कुंभी ९१,७९२

पंचगंगा ५९,०५७

शरद ४४,१७९

गायकवाड, सोनवडे ७,१३६

डी. वाय. पाटील ३०,१५३

गुरुदत्त ४८,८४०

इको केन १८,०२५

हेमरस ४०,६३४

रिलायबल २०,२७५

घोरपडे ४७,५३१

डालमिया ७४,५३७

इंदिरा २९,७४१

एकूण ११,४१,०८७