शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif: .. तर मग मुश्रीफ जातीचा आधार का घेत आहेत? समरजित घाटगेंचा सवाल

By समीर देशपांडे | Updated: January 14, 2023 13:41 IST

घाटगे म्हणाले, आतापर्यंत तीन वेळा मुश्रीफ यांच्यावर छापे पडले. तीनही वेळा त्यांचे तेच तेच आरोप असतात.

कोल्हापूर - माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापे टाकल्यानंतर ते का छापे पडले याबाबत वस्तुस्थिती न सांगता ते जातीचा आधार का घेत आहेत, अशी विचारणा शाहू सहकार समुहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी केली आहे. आपल्यावरील कारवाईमागे घाटगे असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर शनिवारी पत्रकार परिषदेत घाटगे यांनी प्रत्युत्तर दिले. 

घाटगे म्हणाले, आतापर्यंत तीन वेळा मुश्रीफ यांच्यावर छापे पडले. तीनही वेळा त्यांचे तेच तेच आरोप असतात. हे छापे पडले तेव्हा मी दिल्लीत होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी शाहू महाराजांचा वंशज आणि विक्रमसिंह घाटगे यांचा चिरंजीव आहे. मुश्रीफ यांच्यासारखा पाठीत खंजीर खुपसणारा नाही. जो वार करायचा तो समोरून करणारा आहे. मला किरीट सोमय्या यांच्या मागे लपायची गरज नाही. माझ्याकडेही अनेक गोष्टी आहेत. वेळ आल्यावर छाती ठोकून मी त्या जनतेसमोर आणणार आहे. 

मुश्रीफ आणि मलिक यांचे काय संबंध

छापे पडल्यानंतर मुश्रीफ यांना जात आठवली. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर छापे पडले ते मुश्रीफ यांना आठवले नाही. परंतु, दहशतवादी कारवाया करणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपावरून मलिक तुरूंगात होते. अशा मलिक यांची मात्र मुश्रीफ पाठराखण करतात. मग मुश्रीफ आणि मलिक यांचे नेमके काय संबंध आहेत हेदेखील आता तपासावे लागणार असल्याचे घाटगे म्हणाले.  

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय