शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

...त्यांची आयुष्यभराची मिळकत पूराने केली गिळंकृत, हजारो पुस्तके नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:35 IST

कोल्हापूरात आलेल्या महापूरामुळे ज्येष्ठ मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा तसेच प्रा. गोपाळ गावडे यांनी आयुष्यभर जमा केलेली दुर्मिळ आणि जपून ठेवलेल्या पुस्तकांची मिळकत गिळंकृत झाली.

ठळक मुद्दे...त्यांची आयुष्यभराची मिळकत पूराने केली गिळंकृत, हजारो पुस्तके नष्ट उमाकांत राणिंगा, गोपाळ गावडे यांच्या दुर्मिळ ग्रंथांचा झाला लगदा

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूरात आलेल्या महापूरामुळे ज्येष्ठ मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा तसेच प्रा. गोपाळ गावडे यांनी आयुष्यभर जमा केलेली दुर्मिळ आणि जपून ठेवलेल्या पुस्तकांची मिळकत गिळंकृत झाली.उमाकांत राणिंगा यांचे शाहुपुरीतील कुंभार गल्लीत घर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीचे दुकान गेले पाच दिवस सात फूट पाण्यात होते. वैयक्तिक ग्रंथालयात त्यांनी पाच हजाराहून अधिक ग्रंथसंपदा जतन करुन ठेवली होती.

यापैकी विश्वकोष, ज्ञानकोष, चरित्रकोष, स्मृतिकोष, चित्राव शास्त्रींचे प्राचीन ग्रंथ, मध्ययुगीन चरित्रग्रंथ, समरांगण सूत्रधार आदि सुमारे अडीच हजार दुर्मिळ ग्रंथसंपदा पूराच्या पाण्यात भिजल्याने त्याचा लगदा झाला आहे. यातील दोन हजार पुस्तके वाचण्यायोग्य असली तरी त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.

याशिवाय गणेशोत्सवासाठी खरेदी केलेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे चार लाखांचे नुकसान झाले आहे, ते वेगळेच. यासोबत घरातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, डिजिटल कॅमेरा, हार्डडिस्क आणि सर्व कागदपत्रे खराब झाली आहेत.

मूळचे चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील डॉ. गोपाळ गावडे कोल्हापूरातील महावीर महाविद्यालयात बीएड विभागात प्राध्यापक आहेत. पंचगंगा नदीकाठाजवळील शुक्रवार पेठेत शंकराचार्य मठाच्या बाजूला असलेल्या त्यांच्या घरात आठ फूट पाणी शिरले. विद्यार्थी असल्यापासून जमा केलेली ३000 हून अधिक पुस्तके त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात होती.१९८९, २00५ सालच्या दोन्ही महापूराचा अनुभव घेतल्याने गावडे यांनी पाणी वाढू लागले तसे ही पुस्तके पाच फुटाच्यावर तीन रॅकमध्ये ठेवली. मात्र या महापूराने ती गिळंकृत केली. नेसत्या वस्त्रानीशी सहकाऱ्यांच्या घरात स्थलांतरीत झालेल्या गावडे यांनी न राहवून मंगळवारी भर पावसात पोहत घर गाठले आणि पुस्तके आणखी उंचावर ठेवली, परंतु पाणी जास्त वाढल्याने सांसारिक साहित्यासह पुस्तकांचेही नुकसान झाले.सर्व्हिस रेकार्ड धोक्यातया महापूरात गावडे सरांचे सर्व शासकीय रेकॉर्डही नष्ट झाले आहे. पंचनाम्यात फर्निचर, टीव्ही, फ्रीजसह त्यांची २९ वर्षाच्या नोकरीच्या आॅर्डर्स, प्रोफेसर पदाचा प्रस्ताव, प्रशस्तीपत्रे, सन्मानचिन्हे, रेशन, आधार, पॅन, मतदान ओळखपत्रे, एटीएम व गॅसचे कार्ड, मुलांची आणि त्यांची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, प्लॉट आणि फ्लॅटची कागदपत्रे, एलआयसीच्या पॉलिसींचा लगदा झाला आहे. 

टीव्ही, फ्रीज, फर्निचर या वस्तू पुन्हा मिळविता येतीलही; परंतु ४0 वर्षांत जमा केलेल्या आवडीच्या आणि गरजेच्या पुस्तकांची हानी कशी भरून निघणार? कितीही पैसे भरले तरी कुठून कुठून जमा केलेल्या या पुस्तकांचा सत्यानाश झाला आहे.-डॉ. गोपाळ गावडे,प्राध्यापक, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरliteratureसाहित्य