शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

पूरग्रस्तांच्या घरी चोरी, चार लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 10:47 IST

महापुराचे पाणी चिखली, लक्ष्मीपुरी येथे आल्याने घरे बुडाली होती. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे चार लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केला. लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस व चिखली (ता. करवीर) येथील दोन घरांमध्ये चोरी झाली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी व करवीर पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्तांच्या घरी चोरी, चार लाखांचा मुद्देमाल लंपासलक्ष्मीपुरी, चिखली येथील घटना

कोल्हापूर : महापुराचे पाणी चिखली, लक्ष्मीपुरी येथे आल्याने घरे बुडाली होती. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे चार लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केला. लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस व चिखली (ता. करवीर) येथील दोन घरांमध्ये चोरी झाली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी व करवीर पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.पंचगंगेला आलेल्या महापुरात चिखली, आंबेवाडी गावे पाण्याखाली गेली होती. तसेच जयंती नदीला आलेल्या महापुरात लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसर पाण्याखाली गेला होता. येथील अमोल मनोहर कांबळे (वय ३५) यांचे रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस शेजारी घर आहे. पुराचे पाणी घरी आल्याने त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम लोखंडी तिजोरीत ठेवून घर बंद करून श्रमिक हॉल येथे राहण्यासाठी गेले होते.

पाणी ओसरल्यानंतर ते कुटुंबासह घरी गेले असता दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यामध्ये १८ हजार रोकड, सोन्याचे गंठण, ब्रेसलेट, नेकलेस, वेलजोड, कर्णफुले, चेन, अंगठ्या असे १२ तोळे दागिने, चांदीच्या वस्तू असा सुमारे अडीच लाख किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.चिखली येथील नितीन नाना कांबळे (३५) यांच्याही घरी पाणी आल्याने ते स्थलांतरित झाले होते. पाणी ओसरल्यानंतर ते घरी गेले असता दरवाजा मोडलेला दिसला. ३५ हजार रोकड, सोन्याची चेन, वळे, बदाम, चांदीचे ब्रेसलेट, करदोडा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. त्यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली.

महापुरात अडकलेल्या घरांना चोरट्यांनी लक्ष केले. कसबा बावडा येथून ८० तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते. आठ ते दहा घरे फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलीस गस्त घालत असले तरी चोरट्यांनी घरे फोडून त्यांना आव्हान दिले आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांत भीती पसरली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर