शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

पत्नीच्या हौसेसाठी चक्क चोरली बुलेट कुरळपच्या तरुणास अटक : बुलेट हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:52 IST

कोल्हापूर : प्रेमविवाह केलेल्या पत्नीच्या हौसेसाठी कावळा नाका परिसरातील वर्कशॉपमधून बुलेट चोरणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडले. संशयित जयदीप शहाजी पाटील (वय २२, रा. सुयोग कॉलनी, कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, पंडित बापू सुतार (४८, रा. शेंडूर, ता. कागल) यांची बुलेट ...

कोल्हापूर : प्रेमविवाह केलेल्या पत्नीच्या हौसेसाठी कावळा नाका परिसरातील वर्कशॉपमधून बुलेट चोरणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडले. संशयित जयदीप शहाजी पाटील (वय २२, रा. सुयोग कॉलनी, कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, पंडित बापू सुतार (४८, रा. शेंडूर, ता. कागल) यांची बुलेट (एमएच ०९ ईएच ६५३५) मुलगा अवधूत  व भाचा शनिवारी (दि. २६) कावळानाका येथील वर्कशॉपमध्ये सर्व्हिसिंगसाठी घेऊन आले होते. यावेळी अनोळखी युवकाने सुतार यांचा मुलगा अवधूत याला मी वर्कशॉपमधील कर्मचारी आहे असे सांगून बुलेट ट्रायलसाठी घेऊन गेला. तो परत आला नाही.

फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पंडित सुतार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २८) फिर्याद दिली. वर्कशॉपच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याद्वारे पोलीस चोरट्याचा माग काढला असता कावळा नाक्याहून शिवाजी विद्यापीठामार्गे हॉकी स्टेडियमकडून कळंब्याच्या दिशेने घेऊन गेल्याचे दिसले. त्यानंतर चोरटा हा कळंबा येथे राहत असल्याचे समजताच घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.

साहेब, आपण चोर नाही. माझा प्रेमविवाह झाला आहे. पत्नीला बुलेट आवडते. अधिक महिना असल्याने सासुरवाडीला जाण्याचा बेत आखला. बुलेट कावळा नाका परिसरातील वर्कशॉपमध्ये सर्व्हिसिंगला येत असल्याची माहिती होती. त्यानुसार वर्कशॉमध्ये कर्मचारी असल्याचे सांगून सर्व्हिसिंगला आलेल्या तरुणाकडून चावी घेऊन ट्रायलच्या नावाखाली बुलेट घेऊन पसार झालो. तेथून कळंबा येथील घरी आलो. याठिकाणी नंबरप्लेट बदलून पत्नीला नवीन बुलेट खरेदी केल्याचे सांगितले. त्याच दिवशी पत्नीला घेऊन मोरेवाडी (सातारा) येथील सासूरवाडीस गेलो. सासू-सासºयांना लग्न केल्यानंतर जावयाची प्रगती झाली असे वाटावे यासाठी नवीन बुलेट खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर बुलेटचे पूजनही केले. सासरवाडीत मुक्काम करून सोमवारी (दि. २८) कोल्हापुरात आलो. पत्नीच्या हौसेपोटी आपण चोरी केल्याचे सांगितले.घरची परिस्थिती चांगलीच्संशयित जयदीप हा पत्नीसह गणपतीपुळे येथे एका जहाज कंपनीत काम करत होते. चार महिन्यांपूर्वी दोघांनीही नोकरी सोडली. प्रेमविवाह केल्याने दोघेही कळंबा येथे भाड्याने घर घेऊन राहू लागले.च्सध्या तो टिंबर मार्केट परिसरात अत्तर विक्रीचे काम करतो. त्याचे आई-वडील कुरळपमध्ये राहतात. वडील सेवानिवृत्त आहेत. आई गृहिणी आहे. जयदीप हा पदवीधर आहे. त्याच्या घरची परिस्थिती चांगली आहे.च्चोरीचा प्रकार समजताच त्याच्या आई-वडिलांसह सासरच्या लोकांना मानसिक धक्का बसला आहे.